

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने-सामने आहेत. आज दोन्ही संघांना विजय मिळवणे आवश्यक आहे. विशेषत: दिल्ली कॉपिटल्स हा संघ आजचा सामना हा करो या मरो अशा अवस्येतील आहे. दुसरीकडे हैदराबादचा संघ हा दिल्लीपेक्षा केवळ एक सामना अधिक जिंकला आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती दिल्लीपेक्षा चांगली आहे. मात्र आज पराभव झाल्यास दिल्ली कॅपिटल्स संघ यंदा आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. जाणून घेवूया गुणतालिकेतील गणिताविषयी…
आजचा सामना दिल्लीसाठी करा किंवा मरा अशा अवस्येत आहे. कारण या संघाने यंदाच्या हंगामात ६ सामने खेळले असून, केवळ दोन गुण मिळवले आहेत. आता या संघाचे ८ सामने बाकी आहेत. यापुढे जरी संघाने सर्व सामने जिंकले तरी ते १८ गुण मिळवू शकतात. गेल्या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर चौथ्या क्रमांकाच्या संघाचे १६ गुण होते. अशा स्थितीत आज दिल्लीचा पराभव झाला तर पुढच्या लीगचा प्रवास कठीण होईल, असे मानले जात आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीसारखीच काहीशी हैदराबाद संघाची अवस्था आहे. या संघटाने ६ सामन्यांमध्ये केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आज या संघाचा पराभव झाल्यास स्पर्धेत बाहेर पडण्याची टांगती तलवार या संघावर येणार आहे.
हेही वाचा :