Faf Du Plessis And Glenn Maxwell : फाफ डू प्लेसिस-ग्लेन मॅक्सवेल जोडीने रचला नवा विक्रम | पुढारी

Faf Du Plessis And Glenn Maxwell : फाफ डू प्लेसिस-ग्लेन मॅक्सवेल जोडीने रचला नवा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. बेंगलोरचे फलंदाज विस्फोटक फलंदाजी करत आहेत. त्यांना सोमवारी झालेल्या (दि.१७) स्पर्धेतील २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सामन्यात आरसीबीचा पराभव झाला असला तरी, त्यांच्या दोन फलंदाजांनी मोठा विक्रम रचला आहे. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अष्टपैलू खेळा़डू ग्लेन मॅक्सवेल यांनी विस्फोटक खेळीने विराट कोहली आणि केएल राहुल जोडीचा मोठा विक्रम मोडीत काढला. (Faf Du Plessis-Glenn Maxwell)

सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला २२७ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला विराटच्या रूपात पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. त्याच्या पाठोपाठ महिपाल लोमरोर हादेखील भोपळा न फोडता तंबूत परतला. यावेळी संघाची धावसंख्या २ बाद १५ इतकी होती. यानंतर फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूत १२६ धावांची भागीदारी रचली. या भागिदारीमुळे आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले.

यावेळी फाफने ३३ बॉलमध्ये ४ षटकार आणि ५ चौकार लगावत ६२ धावा केल्या. तसेच, मॅक्सवेलने ३६ बॉलमध्ये ३ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने ७६ धावांती तुफानी खेळी केली. आक्रमक फलंदाजीमुळे दोघेही संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते, पण धोनीच्या रननितीमुळे दोघेही ठराविक वेळेन बाद झाले. दोघांच्या विकेट्समुळे बेंगलोर २१८ धावांपर्यंत मजल मारू शकला. सामन्यात बेंगलोरचा ८ धावांनी पराभव झाला.

फाफ डू प्लेसिस – ग्लेन मॅक्सवेल जोडीने रचला विक्रम

फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल जोडीने आयपीएल इतिहासात तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचत मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नावावर होता. त्यांनी २०१६ साली झालेल्या आयपीएल हंगामात गुजरात लायन्सविरुद्ध १२१ धावांची भागीदारी रचली होती.

हेही वाचा;

Back to top button