[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा…" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : १४ महिने मी कारागृहात होतो. तिथला भत्ता खावून मी बाहेर आलोय. त्यामुळे आता कोणीही मला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, असं आव्हान महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला दिलं आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत बोलत असताना देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केल्या. (MVA Vajramuth Sabha)
देशमुख म्हणाले की, गृहमंत्री असताना परबीर सिंह यांच्यावर दबाव टाकून १०० कोटी घेण्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर एक वर्षे चौकशी चालली. एक वर्षाच्या तपासानंतर हायकोर्टाने दिलेल्या निकालात सांगितलं की, सर्व आरोप ऐकलेल्या माहितीवर आधारित आहेत. त्यांच्यावरील आरोपांचे पुरावे नाहीत. (MVA Vajramuth Sabha)
माझ्यावर १०० कोटींचा आरोप झाला अन् चार्जशिट १ कोटी ७१ लाखांची दाखल झाली. त्यावेळी कोर्टाने विचारलं याचे तरी पुरावे आहे का? माझ्यावर आरोप करणारा सहा महिने फरार होता. मला केवळ फसवण्यात आलं. १४ महिने मी कारागृहात होतो. तिथला भत्ता खावून मी बाहेर आलोय. आता कोणी मायचा लाल मला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, असं आव्हानच अनिल देशमुख यांनी भाजपला दिलं आहे.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
अधिक वाचा :