

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ स्पर्धेचा थरार आता शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत एकूण १९ सामने खेळले गेले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकत आपली दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. ( IPL Golden Duck)
शुक्रवारी (दि.१४) सनरायझर्स हैदराबादने केकेआर संघाचा २३ धावांनी पराभव केला. यंदाच्या आयपीएल हंगामात हैदराबाद संघाचा दुसरा विजय ठरला आहे. या सामन्यात सुनील नारायण पुन्हा एकदा गोल्डन डकचा बळी ठरला. ( फलंदाज पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याला 'गोल्डन डक' असे म्हटलंजाते.) आयपीएलच्या इतिहासातील गोल्डन डकशी सुनीलचे नाते जुने आहे. जाणून घेऊया आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकचे शिकार झालेले फलंदाजांविषयी…
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक झालेला खेळाडू हा मनदीप सिंग आहे. २०१०-२०२३ या कालावधीत त्याने ११० सामने खेळत १६९४ धावा केल्या;परंतु आयपीएलमध्ये तो तब्बल १५ वेळा गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. मनदीप सिंग हा दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, आरसीबी संघाकडून खेळला आहे.
आयपीएलमध्य सर्वाधिकवेळा गोल्डन डक झालेल्या खेळाडूंच्या यादीत सुनील नारायण याचे नाव दुसर्या
स्थानावर आहे. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो पुन्हा एकदा गोल्डन डकचा बळी ठरला. सुनील आयपीएलच्या इतिहासात एकूण १४ वेळा शून्यावर तंबूत परतला आहे. २०१२-१३पर्यंत सुनीलने एकूण १५२ सामने खेळताना 1032 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात दिनेश कार्तिक एकूण १४ वेळा गोल्डन डक ठरला आहे. तो दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायन्स, पंजाब किंग्स, केकेआर, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघाकडून खेळला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याही नावाचा समावेश आहे. रोहितने २००८-२०२३ या कालावधीत एकूण २३० सामने खेळताना ५९६६ धावा केल्या आहेत; परंतु कर्णधार रोहितने देखील एकूण १४ वेळा गोल्डन डक झाला आहे.
आयपीएल स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणार्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा समावेश आहे. मात्र या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक वेळा गोल्डन डक होण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
हेही वाचा :