CSK vs RR : धोनी-जडेजा ठरले अपयशी; राजस्थानचा चेन्नईवर रोमांचक विजय

CSK vs RR : धोनी-जडेजा ठरले अपयशी; राजस्थानचा चेन्नईवर रोमांचक विजय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉस बटलरची अर्धशतकी खेळी आणि रवीचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलने पटकावलेल्या प्रत्येकी २ विकेट्सच्या जोरावर राजस्थानने रोमांचक सामन्यात चेन्नई ३ धावांनी विजय मिळवला. चेन्नईकडून डेवॉन कॉनवेने अर्धशतकी खेळी केली. तर धोनी आणि जडेजाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र, धोनी आणि जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी व्यर्थ्य ठरली. हा सामना चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.

तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने १७५ धावा केल्या असून चेन्नईसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. जॉस बटलरने ३ षटकार आणि १ चौकार लगावत अर्धशतकी खेळी केली तर देवदत्त पडिकलने २६ चेंडूमध्ये ३८ धावा केल्या. याच्या बळावर राजस्थानला १७५ धावांपर्यंत मजल मारता आली. बटलर आणि पडिकल शिवाय रविचंद्रन अश्विननेही २२ चेंडूमध्ये ३० धावा केल्या. तर चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी  २ तर आकाश सिंह आणि मोईल अलीने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news