Ben Stokes IPL 2023 : धोनीला धक्का, सीएसकेचा ‘वेग’ मंदावणार; बेन स्टोक्स गोलंदाजीला मुकणार

Ben Stokes IPL 2023 : धोनीला धक्का, सीएसकेचा ‘वेग’ मंदावणार; बेन स्टोक्स गोलंदाजीला मुकणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ben Stokes IPL 2023 : आयपीएल सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे समोर आले असून तो स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजी करणार नाही अशी माहिती पुढे आली आहे. स्टोक्सच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सध्या गोलंदाजी करत नाही, त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाल्यास तो नंतरच्या सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना दिसेल असेही सांगण्यात येत आहे.

वृत्तानुसार, गेल्या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यात स्टोक्सच्या (Ben Stokes IPL 2023) गुडघ्याची जुनी दुखापत वाढली. ज्यामुळे त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये फक्त नऊ षटके टाकली. कसोटी मालिका संपल्यानंतर त्याने आपल्याला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत असल्याचे मान्य केले होते. दरम्यान, त्याने या समस्येसाठी 'कॉर्टिसोन इंजेक्शन' घेतले आहे ज्याचा उपयोग सूज कमी करण्यासाठी केला जातो.

सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, 'मला वाटते स्टोक्स हा फलंदाज म्हणून खेळण्यास तयार आहे. आम्हाला त्याच्या गोलंदाजीची वाट पाहावी लागेल. इंजेक्शन घेतल्यानंतर रविवारी त्याने गोलंदाजी केली. चेन्नईतील डॉक्टर आणि ईसीबी (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) एकत्र काम करत आहेत. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्टोक्स जास्त गोलंदाजी करणार नाही. आशा आहे की तो स्पर्धेच्या उर्वरीत सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यास सक्षम होईल. स्टोक्सने पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे आणि अॅशेसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे,' असे व्यक्त केले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात सीएसकेने स्टोक्सला (Ben Stokes IPL 2023) तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. इंग्लंडचा कसोटी कर्णधार स्टोक्स गेल्या आठवड्यात भारतात आला आहे. त्यानंतर त्याने आपल्या सीएसके संघासोबत सराव करण्यास सुरुवात केली. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आणि 16 जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेसाठी तो आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी मायदेशी रवाना होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news