IPL 2023 : मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल; बुमराहऐवजी अर्जुन तेंडूलकरला संधी? | पुढारी

IPL 2023 : मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल; बुमराहऐवजी अर्जुन तेंडूलकरला संधी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चला सुरूवात होणार असून सर्वत्र आयपीएलचे वारे वाहत आहे. भारतासह इतर देशांतील खेळाडू आपआपल्या संघात दाखल झाले आहेत. सर्वांनी जोरदार सराव करण्यास सुरूवात केली आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (IPL 2023)

रोहित शर्माकडे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून बघितले जाते. मुंबईने रोहितच्या नेतृत्वात एकूण 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या हंगामातील मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरूध्द खेळवण्यात येणार आहे. हा सामना चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. (IPL 2023)

दरवर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याची चर्चा सुरू असते. परंतु, यंदा सर्वाधिक चर्चा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या मुंबई इंडियन्सच्या सामन्याची होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज आणि मुंबईच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका बजावणारा जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी संघात कोणत्या गोलंदाजाला स्थान द्यायचे असा प्रश्न एमआयच्या व्यवस्थारपनासमोर उभा आहे. अशातच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरची संघात निवड होण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. नुकताच त्याने रणजी स्पर्धेत गोवा संघाकडून खेळला. त्याने या स्पर्धेत शतकहे फटकावले असून गोलंदाजीत प्रभावी प्रदर्शन केले.

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एमआयचा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन हे संघासाठी सलामी देतील. ही जोडी पॉवर-प्लेमध्ये धावा करण्यात पटाईत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस जो हा बेबी एबी डिव्हिलियर्स नावाने क्रिकेट विश्वात ओळखला जातो. तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या तर, मिस्टर 360 नावाने ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. तिलक वर्माला पाचव्या, तर अष्टपैलू कॅमेरून ग्रीन सहाव्या क्रमांकावर खेळेल. यादरम्यान, अर्जुन तेंडूलकरला संघात सातव्या क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा;

Back to top button