IBA Women’s Boxing World Championships : भारताच्या नीतू घंघासने रचला इतिहास; वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पहिले सुवर्ण

IBA Women’s Boxing World Championships : भारताच्या नीतू घंघासने रचला इतिहास; वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पहिले सुवर्ण
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मंगोलियाच्या लुत्साइखान हिला पराभूत करुन भारताच्या नीतू घंघासने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पयनशीप जिंकून इतिहास रचला. शनिवारी (दि.२५) तिने ४५-४८ या वजनी गटात सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ती पहिल्यांदा विश्वविजेती बनली आहे. नीतू घंघास या भारतीय बॉक्सरने मंगोलियाच्या लुत्साइखानला ५-० या फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. (IBA Women's Boxing World Championships)

हा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत विजेता कोण ठरणार यांचा अंदाज लागणे कठीण बनले होते. सामन्याचा निकाला लागण्याच्या आधीपर्यंत दोन्ही प्रतिस्पर्धी विजयाचा जल्लोष करण्यासाठी आतुर असल्याचे पाहण्यास मिळाले. पण अखेर पंचांनी आपला निर्णय नीतूच्या पारड्यात टाकला आणि मंगोलियाच्या लुत्साईगानच्या बॉक्सरला निराशेला सामोरे जावे लागले.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीतू घंसासने अभिनंदन केले आहे.

मेरी कोमला पराभूत करुन नीतू आली प्रकाश झोतात

भारताची महान बॉक्सर मेरी कोमला पराभूत करून नीतू प्रकाश झोतात आली होती. मिनी क्युबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीतूच्या खेळाने भारतीय बॉक्सर मेरी कोमला थक्क केले होते. कॉमनवेल्थ गेम्समधील ४८ किलो वजनी गटाच्या चाचण्यांदरम्यान मेरी कोमला रिंग सामन्यात गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमला उपांत्य फेरीच्या पहिल्या फेरीत नीतूकडून पराभव पत्करावा लागला होता.

नीतूची कामगिरी

नीतूने 2017 मध्ये युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ही स्पर्धा गुवाहाटी येथे खेळवली गेली होती. यानंतर 2018 मध्ये तिने युथ एशियन चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. तिने 2018 मध्ये यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा चमत्कार केला आणि चॅम्पियन बनली. याशिवाय तिने 2022 मध्ये सोफिया बल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रेडजा कपमध्ये सुवर्ण आणि 2023 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news