Punjab Kings XI IPL 2023 : पंजाब किंग्जला धक्का! ‘या’ इंग्लिश खेळाडूला मिळाली नाही ‘एनओसी’ | पुढारी

Punjab Kings XI IPL 2023 : पंजाब किंग्जला धक्का! ‘या’ इंग्लिश खेळाडूला मिळाली नाही ‘एनओसी’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Punjab Kings XI IPL 2023 : आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. पंजाब किंग्ज त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. पंजाब किंग्जने आजपर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. पण आता आयपीएल 2023 च्या आधीच पंजाब संघासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याच्या एका स्टार खेळाडूला अगामी आयपीएल हंगामात खेळण्यासाठी एनओसी मिळाली आहे.

हा खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार

इंग्लंडचा स्टार खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे, जॉनी बेअरस्टोला अद्याप आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी मिळालेली नाही. गेल्या हंगामात हे दोन्ही खेळाडूंनी पंजाब किंग्जसाठी खेळले होते. अशा परिस्थितीत पंजाब संघासाठी एकाच दिवशी चांगली आणि वाईट बातमी मिळाली आहे.

मागील हंगाम आश्चर्यकारक

गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत लियाम लिव्हिंगस्टोनला दुखापत झाली होती. त्याला गुडघा आणि घोट्याला दुखापत झाली आहे, परंतु तो अलीकडेच दुबई लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या सराव सत्राचा सहभागी झाला होता. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, तो संपूर्ण आयपीएल हंगामासाठी उपलब्ध असू शकतो. पंजाब किंग्जने त्याला 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांमध्ये त्याने 437 धावा केल्या होत्या. लिव्हिंगस्टोनशिवाय सॅम कुरेनचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Punjab Kings XI IPL 2023)

बेअरस्टोला एनओसी नाहीच

जॉनी बेअरस्टोवरच्या पायावर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. दुखापतीमुळे तो 2022 च्या टी-20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अद्याप त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी दिलेली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टपासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. बेअरस्टोला 2022 च्या लिलावात पंजाब किंग्जने 6.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल 2022 च्या 11 सामन्यांमध्ये त्याने 253 धावा केल्या होत्या. (Punjab Kings XI IPL 2023)

Back to top button