Ind vs Aus 4th test day 3 : तिसऱ्या दिवसा अखेर भारत १९१ धावांनी पि | पुढारी

Ind vs Aus 4th test day 3 : तिसऱ्या दिवसा अखेर भारत १९१ धावांनी पि

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद येथे सुरु असलेल्‍या चौथ्‍या कसोटीत सलामीवीर शुभमन गिल याने दमदार शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील त्‍याचे हे दुसरे शतक असून मायदेशातील पहिले शतक ठरले आहे. तसेच मागील तीन महिन्‍यांमध्‍ये त्‍याचे हे पाचवे शतक आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताने 37 धावांवर खेळायला सुरूवात केली. 99 व्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या तीन गडी गमावून 289 धावा आहेत. ( Ind vs Aus 4th test day 3 )

अहमदाबादमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताचा स्कोर 289/3 आहे. विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 191 धावांनी मागे आहे. जडेजा आणि कोहली यांच्यात 44 धावांची भागीदारी झाली आहे. या दोघांनाही सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले आहे. ( Ind vs Aus 4th test day 3 )

विराट कोहलीचे अर्धशतक

सामन्यात विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. कसोटीतील 16 डावांनंतर त्याला अर्धशतक झळकावले. यासह विराटने भारतीय मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. मायदेशात कसोटीत ४००० धावा पूर्ण करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे.

भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा

भारताने तीन विकेट गमावून 250 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. कोहली आपल्या अर्धशतकाच्या पोहोचला आहे.

भारताला तिसरा धक्का; शुभमन गिल बाद

79 ओव्हरमध्ये शुभमन गिलच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. शुभमन गिल 235 चेंडूत 128 धावा करून बाद झाला. त्याला नेथन लायनने आपल्या फिरकीने त्याला एलबी़डब्ल्यू बाद केले

विराट – गिलची अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. गिल संयमी फलंदाजी करत आहे तर, संथ सुरुवातीनंतर विराट कोहलीनेही लय पकडली आहे. भारतीय संघाची धावसंख्या 77 षटकांत 2 बाद 243 अशी आहे.

चहापानानंतर खेळाला सुरूवात

चहापानानंतर खेळ सुरू झाला. आजचा तिसऱ्या सत्राचा खेळ सुरूच आहे. भारताने दोन गडी गमावून १९६ धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 109 धावा आणि विराट कोहली 2 धावा करत क्रीजवर आहे.

चेतेश्वर पुजारा बाद

ज्या षटकात शुभमनने शतक झळकावले, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्याला टॉड मर्फीने एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 121 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. पुजाराने शुभमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 248 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली.

शुभमन गिलचे दमदार शतक

शुभमन गिलने 194 चेंडूत दुसरे कसोटी शतक झळकावले. एकंदरीत त्याचे हे सातवे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. शुभमनने वनडेमध्ये चार शतके आणि टी-20 मध्ये एक शतक झळकावले आहे. शुभमनने बांगलादेशविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

  • 49 व्या षटकानंतर भारताने 150 धावांचा टप्पा पूर्ण केला.
  • उपाहारापर्यंत भारताने एक गडी गमावून 129 धावा केल्या. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने 55 धावांची भागीदारी केली होती.
  • मिचेल स्टार्कच्या चेंडूवर चौकार मारून शुभमन गिलने कसोटी कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. गिलने 93 चेंडूत 51 धावा केल्या. 29 व्या षटकानंतर भारताने १०० धावांचा टप्पा पार केला.
  • 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूला भारताला पहिला धक्का बसला. मॅथ्यू कुहनेमनने रोहितला लबुशेन करवी झेलबाद केले. रोहितला 58 चेंडूत 35 धावा करता आल्या. या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 74 धावांची भागीदारी केली. सध्या शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहेत.

Ind vs Aus 4th test day 3 : पुजाराच्‍या ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध दोन हजार धावा पूर्ण

चौथ्‍या कसोटीतील पहिल्‍या डावात ऑस्‍ट्रेलियाने सर्वबाद ४८० धावा केल्‍या. दुसर्‍या दिवशी भारताने विनाबाद ३६ धावा करत सावध सुरुवात केली होती. आज ३५ धावांवर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. यानंतर ४२ धावांवर चेतश्‍वर पुजारा तंबूत परतला. पुजारा हा ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्‍ये दोन हजार धावा पूर्ण केल्‍या आहेत. अशी कामगिरी करणारा तो चौथ्‍या भारतीय फलंदाज बनला आहे.

सलामीवीर शुभमग गिल याने १९४ चेंडूत शतकी खेळी पूर्ण केली. त्‍याचे मायदेशातील हे पहिले तर कसोटीतील दुसरे कसोटी शतक ठरले आहे. विशेष म्‍हजे शुभमन गिल याने मागील तीन महिन्‍यांमध्‍ये हे पाचवे शतक झळकावले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button