New Zealand vs Srilanka : टीम इंडियासाठी खूशखबर...न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या कसोटी सामन्‍यात श्रीलंका 'बॅकफूट'वर! | पुढारी

New Zealand vs Srilanka : टीम इंडियासाठी खूशखबर...न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या कसोटी सामन्‍यात श्रीलंका 'बॅकफूट'वर!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्‍न करत असलेल्‍या टीम इंडियासाठी खूशखबर आहे. कारण श्रीलंका-न्‍यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात श्रीलंका बॅकफूटवर आली आहे. ही मालिका २-०ने जिंकली तरच श्रीलंकेचा संघ कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या अंतिम सामन्‍यात पोहचू शकतो. मात्र पहिल्‍याच कसोटीत न्‍यूझीलंडच्‍या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ पराभवाच्‍या उंबरठ्यावर उभा आहे. (New Zealand vs Srilanka)

श्रीलंका-न्‍यूझीलंड ख्राइस्टचर्च कसोटीत श्रीलंकेने पहिल्‍या डावात सर्वबाद ३५५ धावा केल्‍या. यानंतर न्‍यूझीलंडची खराब सुरुवात झाली. ५ गडी गमावत १६५ धावा केल्‍या. यानंतर डॅरेल मिशेल याने दमदार शतक झळकावले. मिशेलच्‍या खेळीमुळे न्‍यूझीलंडचा संघाने पहिल्‍या डावात ३७३ धावा केल्‍या. डेरॅल मिशेलच्‍या दमदार शतकारच्‍या जोरावर न्‍यूझीलंडने ३७३ धावा केल्‍या आहेत.

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलकेच्‍या संघाने दुसर्‍या डावात ३ गडी मगावत ८३ धावा केल्‍या आहेत. न्‍यूझीलंडच्‍या
ब्‍लेअर टिकनर याने श्रीलंकेच्‍या ओशाद फर्नांडो, दिमुथ करुणारत्‍ने आणि कुसल मेंडिस यांना तंबूत धाडले. श्रीलंकेकडे ६५ धावांची आघाडी असली तरी तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्‍याने हा संघ बॅकफूटवर गेला आहे.

आता कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या अंतिम सामन्‍यात पोहण्‍यासाठी जागतिक कसोटीत तिसर्‍या स्‍थानी असणार्‍या श्रीलंकेला मालिकेतील दोन्‍ही कसोटी सामने जिंकणे अनिवार्य आहे. मात्र पहिल्‍याच कसोटीत श्रीलंका संघ पिछाडीवर
पडल्‍याने आता भारताच्‍या कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या अंतिम सामन्‍याकडील वाटचाल अधिक सूकर झाली आहे.

 

हेही वाचा :

 

 

 

Back to top button