पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात पॅट पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नसणार आहे. (IND vs AUS 4th Test) इंदुर कसोटीमध्ये विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला चौथ्या कसोटीपूर्वी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट पॅट कमिन्स याला अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी स्टिव्ह स्मिथचं ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पॅट कमिंस इंदुरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही संघाचा भाग नव्हता. (IND vs AUS 4th Test)
पॅट कमिन्स याच्या आईची प्रकृती बिघडली असल्याने तो दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियास परतला होता. तो अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी भारतात दाखल होईल, असे मानले जात होते. तो या सामन्यासाठीही उपलब्ध नसणार आहे. दरम्यान, यानंतर खेळवण्यात येणाऱ्या वन-डे मालिकेसाठी पॅट कमिन्स उपलब्ध असेल का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ॲरॉन फिंच निवृत्त झाल्यानंतर पॅट कमिंसवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (IND vs AUS 4th Test)
पहिला सामना – भारताचा १ डाव आणि १३२ धावांनी विजय
दुसरा सामना – भारताचा ६ विकेट्सने विजय
तिसरा सामना – ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने विजय
चौथा सामना – ९ ते १३ मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे