Ravichandran Ashwin Record : अश्विनने रचला इतिहास; कपिल देव यांच्या विक्रमाला टाकले मागे | पुढारी

Ravichandran Ashwin Record : अश्विनने रचला इतिहास; कपिल देव यांच्या विक्रमाला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूध्द सुरू असलेल्या इंदूर कसोटी सामन्यात अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अश्विनने इंदूर कसोटी सामन्यात ३ बळी घेत एक खास विक्रम केला. अश्विन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. (Ravichandran Ashwin Record)

इंदूर कसोटी सामन्यात अश्विनने ३ बळी घेत एक खास विक्रम केला. अश्विन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे, असे करत अश्विनने भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे.

कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण ६८७ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी सामन्यात ३ विकेट घेतल्यामुळे अश्विनच्या खात्यात सध्या ६८९ विकेट्स आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत ९५६ विकेट घेतल्या आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

  • अनिल कुंबळे – ९५६
  • हरभजन सिंग – ७११
  • अश्विन – ६८९
  • कपिल देव – ६८७
  • झहीर खान – ६१०

हेही वाचा;

Back to top button