Rohit Sharma : रोहित शर्मा ठरवणार या दोन खेळाडूंचे भवितव्य, इंदूर कसोटीत घ्यावा लागणार मोठा निर्णय! | पुढारी

Rohit Sharma : रोहित शर्मा ठरवणार या दोन खेळाडूंचे भवितव्य, इंदूर कसोटीत घ्यावा लागणार मोठा निर्णय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील पुढील सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकल्यास मालिका विजयासोबतच भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशी (WTC)च्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित करेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) या सामन्यात कोणतीही चूक करायची नाही. त्यामुळे त्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याच्या या निर्णयावर दोन खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असेल.

‘या’ खेळाडूंचे भवितव्य रोहितच्या हातात

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी अतिशय खराब प्रदर्शन केले होते. अशा परिस्थितीत रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या कसोटी सामन्यात या खेळाडूंना संघाच्या प्लेइंग 11 मधून वगळू शकतो. या खेळाडूंच्या बाहेर पडल्यानेच काही खेळाडूंचे भवितव्य उघडणार आहे. भारताने 19 फेब्रुवारी रोजी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र केएल राहुलला (KL Rahul) संघाच्या उपकर्णधार पदावरून काडून टाकण्यात आले आहे.

इंदूर कसोटीतून (Indore Test) राहुलला डच्चू देऊन त्याच्या जागी सलामीवीर म्हणून शुभमन गिल (Shubaman Gill) संधी देण्यात येईल अशी दाट शक्यता आहे. राहुलने मालिकेत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांसह 38 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिल अप्रतिम लयीत धावत आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलला बेंचवर ठेवणे टीम इंडियासाठी त्रासदायक ठरू शकते. आता कर्णधार रोहित शर्माच्या हातात शुभमन गिलचे भवितव्य आहे.

‘हा’ खेळाडू पदार्पण करू शकतो

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियाकडे आणखी एक खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा (Rohit Sharma) इंदूर कसोटीत ड्रॉप करू शकतो. हा खेळाडू दुसरा कोणी नसून केएस भरत आहे. ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर टीम इंडियात (Team India) सामील झालेला भरतकडून निराशाजनक कामगिरी झाल्याची चर्चा आहे. ऋषभ पंत भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो, तर भरतची बॅट काही प्रभावी कामगिरी करू शकलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित त्याच्या जागी इशान किशनला संधी देऊ शकतो. भरतला वगळले तर ईशान किशनचे नशीब उघडेल आणि तो भारतासाठी कसोटी पदार्पण करू शकेल. तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरू होईल. त्यात रोहित शर्मा शुभमन गिल (Shubaman gill) आणि ईशान किशनचे (Ishan Kishan) भवितव्याबाबतचा पेच सोडवू शकतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Back to top button