

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील पेशावरमधून क्वेटा शहरात येणाऱ्या जाफर एक्सप्रेसमध्ये आज (दि.१६) सकाळी स्फोट झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त 'डॉन'ने दिले आहे.
'डॉन'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जाफर एक्स्प्रेस पेशावरहून क्वेट्टाला जात होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचवतनी रेल्वे स्थानकावर स्फोट झाला. जनरल बोगीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोटाची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात या ट्रेनमध्ये असाच एक स्फोट झाला होता. ज्यामध्ये आठजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात जाफर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते.