Axar Patel : 9वा क्रमांक, 84 धावा.. अक्षर पटेलचा अनोखा विक्रम!

Axar Patel : 9वा क्रमांक, 84 धावा.. अक्षर पटेलचा अनोखा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षर पटेलने (Axar Patel) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. नागपूर कसोटीत टीम इंडियासाठी 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे नाव सर्वाधिक धावा करणाऱ्या एलिट क्लबमध्ये नोंदवले गेले आहे. या क्लबमध्ये अनिल कुंबळेसारख्या महान गोलंदाजांच्या नावाचा समावेश आहे.

नागपूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 177 धावांच्या स्कोअरसमोर पहिल्या डावात 400 धावा केल्या. या डावात टीम इंडियाचा खालच्या फळीतील फलंदाज आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने (Axar Patel) शानदार फलंदाजी करत 84 धावांची खेळी केली होती. त्याचे हे दुसरे कसोटी करियरमधील दुसरे अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

एलिट क्लबमध्ये समावेश असणारे खेळाडू…

104 धावा : जयंत यादव विरुद्ध इंग्लंड (2016)
90 धावा : फारुख इंजिनियर विरुद्ध न्यूझीलंड (1965)
88 धावा : अनिल कुंबळे विरुद्ध दक्षिण आफ्रिका (1996)
86 धावा : करसन घावरी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (1979)
84 धावा : अक्षर पटेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना अक्षर पटेलला (Axar Patel) गोलंदाजीत एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्याने अचूक मारा करत 10 षटकांत 28 धावा दिल्या आणि 3 षटके मेडन टाकली. पण, दुसऱ्या डावातील 3 षटकांच्या गोलंदाजीत त्याने 6 धावा देताना 1 बळीही घेतला. अक्षरने रवींद्र जडेजासोबत 88 धावांची भागिदारी केली. त्यानंतर त्याने मोहम्मद शमीसोबत 52 धावांची भागीदारी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news