

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नरला क्लिन बोल्ड करून करून शमीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 400 वी विकेट मिळवली. हा टप्पा गाठणारा तो भारताचा 9वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे, हरभजन सिंग, कपिल देव, आर. अश्विन, झहीर खान, जवागल श्रीनाथ, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.
अनिल कुंबले-953
हरभजन सिंह-707
कपिल देव-687
आर अश्विन-675*
जहीर खान-597
जवागल श्रीनाथ-551
रविंद्र जडेजा-487*
ईशांत शर्मा-434
मोहम्मद शमी-400*
वॉर्नरने शमीविरुद्ध (Mohammed Shami) पहिल्या षटकात 4 चेंडू खेळले. त्यानंतर शमीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूने वॉर्नरचा घात केला. इनस्विंग चेंडूचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नरला 5 चेंडूत केवळ एक धाव करता आली. बाद झाल्यानंतर वॉर्नर खेळपट्टीकडे बघत पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने नागपूर कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. भारताकडून कसोटी खेळणारा तो 304 वा खेळाडू ठरला आहे. सूर्याने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत, आता तो कसोटीतही चमत्कारीक खेळी करेल असा विश्वास चाह्त्यांना आहे.