Ravi Shastri : ‘उपकर्णधार आहे म्हणून जागा फिक्स नसते, केएल राहुलला बसवा कट्ट्यावर’

Ravi Shastri : ‘उपकर्णधार आहे म्हणून जागा फिक्स नसते, केएल राहुलला बसवा कट्ट्यावर’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केएल राहुलला वगळून प्लेईंग इलेव्हनमध्ये शुबमन गिलला प्राधान्य दिले जावे असे परखड मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केले आहे. गिलसारखा फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना उपकर्णधारपदाचा अर्थ संघातील जागा सुरक्षित आहे, असे नसावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नागपूर येथे गुरुवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी, शास्त्री यांनी भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असावी? कोणाला संधी मिळावी याबाबत आपले मत मांडले. पाचव्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या जवळपासही कोणीही नाही आणि त्याला त्याच स्थानावर उतरवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शुबमन किंवा राहुलची निवड करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करत असते तेव्हा फॉर्म खूप महत्त्वाचा असतो. मी गिल आणि राहुलला नेटमध्ये जवळून पाहिले आहे. जर कठोर निर्णय घ्यावा लागला तर मागे पुढे न पाहता त्याची अंमलबजावणी व्हावी. फूटवर्क, फटका मारतानाचे अचूक टायमिंग या गोष्टी पाहून राहुलपेक्षा गिलला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. उपकर्णधार असल्यामुळे राहुलची निवड निश्चित आहे असे मी मानत नाही. भारतात अनुकूल खेळपट्ट्या बनवण्याबाबत ऑस्ट्रेलियात खूप चर्चा होत आहे पण घरच्या मैदानाचा फायदा घेण्यात काही गैर नाही. तसे सर्वजण करतात, असेही शास्त्रींनी (Ravi Shastri) स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, जर मला कोणी विचारले की कोणत्या प्रकारची खेळपट्टी हवी आहे? काय अपेक्षित आहे? यावर मी म्हणेन की टॉस गमावल्यानंतरही पहिल्या सत्रापासूनच चेंडूने वळण घ्यायला हवे. एक प्रशिक्षक म्हणून मला असे वाटते की भारताने ऑस्ट्रेलियाला मालिकेत 4-0 ने मात द्यावी. मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला त्याचे काम चोख बजावावे लागेल. जर टॉस गमावला आणि खेळपट्टीवर चेंडू वळण घेत नसेल तर कुलदीपसारखा गोलंदाज उपयुक्त ठरेल. जेव्हा फिंगर स्पिनरला मदत मिळत नाही असे स्पष्ट झाल्यास, त्यावेळी लेग स्पिनरने मोर्चे बांधणी करून जादूई प्रदर्शन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news