IND vs AUS
IND vs AUS

IND vs AUS : ‘भारतात विजय मिळवणे ॲशेसपेक्षाही मोठे’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितले बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे महत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर ९ फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे महत्व स्पष्ट केले आहे. "भारतात विजय मिळवणे एशेस पेक्षाही मोठे आहे" असे स्टीव्ह स्मिथ म्हणाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपली मते व्यक्त केली आहेत. (IND vs AUS)

स्टीव्ह स्मिथ शिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसनेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे महत्व स्पष्ट केले आहे. पॅट कमिंस म्हणाला, "ही मालिका जिंकणे म्हणजे विदेशात जाऊन एशेस जिंकल्याप्रमाणे आहे. करियरच्या दृष्टीने ही मालिका आमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारत दौरा केला होता. २०१७ मध्ये कांगारूंना पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने २००४-०५ मध्ये भारतात शेवटची मालिका जिंकली होती. गेल्या १७-१८ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतात मालिकेत विजय मिळवता आलेला नाही. (IND vs AUS)

भारताला पराभूत करणे सर्वांत कठीण – डेव्हिड वॉर्नर (IND vs AUS)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअऱ केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड वॉर्नरनेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत मत मांडले आहे. डेव्हिड वॉर्नरने भारतात विजय मिळवणे किती कठीण काम आहे हे स्पष्ट केले आहे. वॉर्नर म्हणाला, "भारताला पराभूत करणे सर्वांत कठीण आहे" ऑस्ट्रेलियाचा खेळाडूंनी ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारतात विजय संपादन करणे किती महत्वाचे आहे. हे स्पष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव. (IND vs AUS)

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ –

पॅट कमिंस (कर्णधार), अॅश्टन एगर, स्कॉट बोलेंड, अॅलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हँडस्कब, जॉश हेजलवुड, ट्रायवस हेड, उसमान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नेथन लायन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर (IND vs AUS)

हेही वाचंलत का?

logo
Pudhari News
pudhari.news