MS Dhoni-Suresh Raina : माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान, "प्रथम धोनीसाठी खेळलो नंतर..." | पुढारी

MS Dhoni-Suresh Raina : माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान, "प्रथम धोनीसाठी खेळलो नंतर..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याने एका मुलाखतीवेळी धक्कादायक विधान केले. निवृत्तीबाबत विचारलेल्‍या प्रश्नावर बोलताना रैना म्हणाला की, ” मी आणि धोनी सोबतच क्रिकेट खेळलो. ते रांचीचे आहेत आणि मी गाजियाबादचा. मला वाटते की, मी प्रथम धोनीसाठी क्रिकेट खेळलो नंतर देशासाठी त्यामुळेच मी धोनीपाठोपाठ निवृत्ती घेतली.” सुरेश रैनाच्‍या या विधानाची क्रिकेट चाहत्‍यांमध्‍ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (MS Dhoni-Suresh Raina)

महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुरेश रैना यानेही क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले होते. रैनाने त्याच्या आणि धोनीच्या निवृत्तीबाबत स्वत:च स्पष्टीकरण दिले. तो म्‍हणाला
“आम्ही सोबतच क्रिकेट खेळलो. माझे भाग्य आहे की मला भारताकडून आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली. आम्ही सर्वांनी विश्वचषकही जिंकला. लोकांकडून प्रेमही मिळाले.” (MS Dhoni-Suresh Raina)

२०११ वनडे विश्वचषकामध्ये सुरेश रैनाने महत्वपूर्ण कामगिरी केली होती. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ५६१५ धावा केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये त्याने १६०५ धावा त्याच्या नावावर आहेत. सुरेश रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून देखील ओळखले जाते. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वांत जास्त धावा करणारा खेळाडू बनला असला तरीही हा विक्रम अनेक दिवस सुरेश रैना याच्या नावावर होता.
(MS Dhoni-Suresh Raina)

हेही वाचंलत का?

Back to top button