IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्यातून बाहेर | पुढारी

IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 'हा' वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्यातून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यास ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. नागपुरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जॉस हेजलवुड जखमी झाला आहे. त्यामुळे तो मालिकेतील पहिला सामाना खेळू शकणार नाही. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. जॉस हेजलवुड जखमी झाल्याने त्याच्या जागी स्कॉट बोलेंडला संधी दिली जाऊ शकते. (IND vs AUS Test Series)

कॅमरन ग्रीन आणि मिचेल स्टार्कही जखमी असल्‍याने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे नागपूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचे ३ प्रमुख फलंदाज संघाबाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करता ही मालिका महत्त्‍वपूर्ण आहे. दरम्यान, प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर असणार आहे. (IND vs AUS Test Series)

 भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल.राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट/सूर्यकुमार यादव (IND vs AUS Test Series)

ऑस्ट्रेलियन संघ – पॅट कमिन्‍स (कर्णधार), ॲश्टन एगर, स्कॉट बोलेंड, ॲलेक्स कॅरी, कैमरन ग्रीन, पीटर हँड्सकाँब, जॉश हेजलवुड, ट्रायवस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशाने, नेथन लायन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिशेल स्वेपसन आणि डेव्हिड वॉर्नर (IND vs AUS Test Series)

हेही वाचा :

Back to top button