पाकच्‍या माजी क्रिकेटपटूचा जळफळाट, “म्‍हणे, उमरान मलिक सारखे… “ | पुढारी

पाकच्‍या माजी क्रिकेटपटूचा जळफळाट, "म्‍हणे, उमरान मलिक सारखे... "

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्‍या कामगिरीवर टीका करणार्‍या पाकिस्‍तानच्‍या माजी क्रिकेटपटू सोहैल खान याने आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टार्गेट केले आहे. आपल्‍या वेगवान गोलंदाजीने जगभरातील क्रिकेट विश्‍लेषकांकडून उमरानवर मागील काही दिवस कौतुकांचा वर्षाव होत आहे. यानंतर सोहैल याने उमरानला टार्गेट केले आहे. ( Sohail Khan on Umran Malik )

Sohail Khan on Umran Malik : असे गोलंदाज आमच्‍याकडे ढीगाने… 

सोहैल खान याने म्‍हटले आहे की, “उमरान मलिक सारखे गोलंदाज मी खूप पाहिले आहेत. उमरानचे एक ते दोन सामनेही मी पाहिले आहेत. त्‍याने वेगाबाबत शोएब अख्‍तरचा विक्रम मोडला आहे. मात्र अजून त्‍याला मोठा पल्‍ला पार पाडायचे आहे. गोलंदाजीत तुम्‍ही केवळ वेगाचा विचार करणार असला तरी तर तुम्‍हाला आमच्‍याकडे असे १२ ते 1५ गोलंदाज मिळतील. उमरान मलिकसारखे अनेक गोलंदाज आमच्‍याकडे ढीगाने आहेत.”

सोहैल खान पाठोपाठ पाकिस्‍तानी क्रिकेटपटू आकिब जावेद यानेही उमराव याच्‍यावर निशाना साधला. त्‍याने म्‍हटले की, पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज हैरिस रौफ याच्‍या गोलंदाजीचा वेग उमरान मलिकपेक्षा अधिक आहे.

भारतीय संघ व्‍यवस्‍थापनाने उमरान मलिकला प्रोत्‍साहन देत आहे. त्‍याची कामगिरीही तशीच आहे. टीम इंडियासाठी त्‍याने १६ सामने खेळले आहेत. त्‍यामुळे ८ वनडे आणि तेवढ्याच टी-२० सामन्‍यांचा समावेश आहे. १६ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने २४ विकेट घेतल्‍या आहेत. क्रिकेटमधील दोन्‍ही फॉर्मेटमध्‍ये त्‍याची सरासरी ३० आहे. उमरानच्‍या जबरदस्‍त कामगिरीने जळफळाट झालेल्‍या पाकिस्‍तानचा क्रिकेटपटूने उमरानवर टीका करत नवा वाद ओढावून घेतला आहे. यापूर्वी पाकिस्‍तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यानेही तत्‍कालिन वेगवान गोलंदाज इरफान याच्‍यावरही अशीच टीका केली होती. मात्र यानंतर इरफानची कामगिरी अधिक बहरली होती.
(Sohail Khan on Umran Malik )

हेही वाचा : 

 

 

Back to top button