Murali Vijay Retirement : ‘या’ भारतीय फलंदाजाची निवृत्ती! ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी जाहीर केला निर्णय | पुढारी

Murali Vijay Retirement : ‘या’ भारतीय फलंदाजाची निवृत्ती! ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी जाहीर केला निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Murali Vijay Retirement : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका खेळवली जात आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, मात्र याचदरम्यान सोमवारी अचानक टीम इंडियाचा खेळाडू मुरली विजयने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली. यावेळी मुरली विजयने बीसीसीआय, त्याच्या देशांतर्गत क्रिकेट बोर्ड आणि आयपीएलचेही आभार मानले. मुरली विजयने भारतासाठी कसोटी वन-डे आणि टी-20 हे तिन्ही फॉरमॅट खेळले. मध्यंतरी तो संघाबाहेर गेला, त्यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही. तो आयपीएलमध्ये खेळला असून काही काळापासून तो या लिग स्पर्धेतूनही बाहेर आहे.

मुरली विजयची आकडेवारी… (Murali Vijay Retirement)

मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 3982 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 12 शतके आणि 15 अर्धशतके आहेत. त्याची सरासरी 38.28 आणि त्याचा स्ट्राइक रेट 46.29 आहे. दुसरीकडे, टीम इंडियासाठी वन-डे सामने खेळताना मुरलीमे 17 सामने खेळून 339 धावा केल्या. येथे त्याची सरासरी 21.18 आणि स्ट्राइक रेट 66.99 होता. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे. त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी नऊ सामने खेळले आणि 169 धावा केल्या. येथे त्याची सरासरी 18 च्या वर तर स्ट्राइक रेट 109 पेक्षा जास्त आहे. यात त्याला एकही शतक किंवा अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही. असे मानले जात आहे की आता मुरली विदेशातील किकेट लीगचा भाग होऊ शकतो, परंतु यासाठी त्याला बीसीसीआयकडून एनओसीची घ्यावी लागणार आहे.

आयपीएलमध्ये मुरलीने 106 सामने खेळले असून 2619 धावा आहेत. या लिग स्पर्धेत त्याने 2 शतके झळकावली आहेत. असून त्याच्या नावावर 91 षटकार आणि 247 चौकार आहेत. मुरली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला आहे.

निवृत्ती जाहीर करताना मुरली विजय म्हणाला की, ‘मी विदेशात संधी शोधत आहे, जिथे मी माझ्या आवडीच्या खेळात भाग घेत राहीन. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी असेल. मी माझ्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची वाट पाहत आहे. मोठ्या कृतज्ञतेने आणि नम्रतेने मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. 2002 ते 2018 हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रवास आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सन्मान अभिमानास्पद होता.’ (Murali Vijay Retirement)

Back to top button