Gautam Gambhir : गौतम गंभीर कॅप्टन हार्दिक पंड्यावर भडकला, म्हणाला… | पुढारी

Gautam Gambhir : गौतम गंभीर कॅप्टन हार्दिक पंड्यावर भडकला, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gautam Gambhir : न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या टी-20 सामन्यात 100 धावांच्या माफक आव्हानचा पाठलाग करताना भारतीय संघाची भांबेरी उडाली. हा सामना भारताने कसाबसा 6 विकेट्स आणि एक चेंडू राखून जिंकला असला तरी हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने गोलंदाजांचा योग्य वापर का केला नाही? असा सवाल टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने उपस्थित केला आहे.

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) म्हणाला, युझवेंद्र चहलला केवळ 2 षटके देण्यात आली. तो चांगली गोलंदाजी करत होता. दुसरीकडे, अष्टपैलू दीपक हुडाने त्याच्या कोट्यातील सर्व 4 षटके टाकली. लयीत असणारा फिरकीपटू युझवेंद्र चहलला फक्त दोन षटके टाकायला मिळाली तर कसं होईल. चहलने सामन्यात एक महत्त्वाची विकेट घेतली, पण त्याला चार षटके टाकण्यास न देणे हे आश्चर्यकारक आहे,’ अशी त्याने नाराजी व्यक्त केली.

‘तुम्हाला नवीन गोलंदाजांना संधी द्यायची आहे, पण अशातच तुम्ही चहलचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करू शकला असता. चहला त्याचा कोटा पूर्ण करण्याची संधी दिली असती तर तो 99 धावसंख्येपूर्वीच न्यूझीलंडला बाद करू शकला असता,’ असा विश्वासही गंभीरने (Gautam Gambhir) बोलून दाखवला.

लखनौ येथी टी-20 मध्ये भारतासाठी युजवेंद्र चहलने 2 षटकात फक्त 4 धावा देऊन एक विकेट घेतली, तर दीपक हुडाने 4 षटकात 17 धावा देऊन एक बळी मिळवला. टीम इंडियासाठी या सामन्यात अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकात 7 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. टीम इंडियाच्या दमदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला केवळ 99 धावाच करता आल्या, प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 4 गडी गमावून पूर्ण केले.

Back to top button