IND vs NZ T20 : भारत अन् न्यूझीलंडची फिरकीपुढे दमछाक; दोन्ही संघांना मारता आला नाही षटकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने आता १-१ ने बरोबरी केली आहे. (IND vs NZ T20) भारताने न्यूझीलंडला ९९ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतालाही या आव्हानाचा पाठलाग करताना चांगलीच कसरत करावी लागली. भारताने न्यूझीलंडचे १०० धावांचे आव्हान अंतिम षटकात म्हणजेच २० व्या षटकात गाठले.
दोन्ही संघांची फिरकीपुढे दमछाक (IND vs NZ T20)
सध्या टी20 सामना म्हटलं की फलंदाज षटकारांचा पाऊस पाडतात. एका सामन्यात १० ते १२ षटकार सहज मारण्यात येतात. मात्र, लखनौच्या मैदानावर न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघांच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. दोन्ही संघातील एकाही फलंदाजाला षटकार लगावता आला नाही. सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंनी नाचवले. तर भारतीय फलंदाजांकडून न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी चांगलीच कसरत करुन घेतली. न्यूझीलंडच्या १०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना २० षटक गाठावे लागले. (IND vs NZ T20
भारतीय फलंदाजांची फिरकीपुढे कसरत (IND vs NZ T20)
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवची आव्हानाचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूमध्ये २६ धावा केल्या तर हार्दिक पंड्याने २० चेंडूमध्ये १५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून इशान किशनने ३२ चेंडूमध्ये १९ धावा, राहुल त्रिपाठी १८ चेंडूमध्ये १३ धावा, शुभमन गिलने ९ चेंडूमध्ये ११ धावा केल्या. (IND vs NZ T20)
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना एकवेळ न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ६० धावा अशी झाली होती. मिचेल सँटनर आणि मार्क चॅपमनने अनुक्रमे १९ आणि १४ धावा केल्यामुळे न्यूझीलंडला ९९ धावा करता आल्या. न्यूझीलंडचे फलंदाज पाठोपाठ विकेट्स गमावत असताना सँटनरच्या खेळीमुळेच त्यांना ९९ धावांपर्यंत पोहचता आले. (IND vs NZ T20)
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चांगली सुरवात करता आली नाही. भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. सलामीवीर फिन अॅलन याचा त्रिफळा उडवत युजवेंद्र चहलने न्यूझीलंडला पहिला झटका दिला. यानंतर दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट पटकावत न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही १ विकेट पटकावली तर अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. (IND vs NZ T20)
India held their nerve to win with one ball remaining! #INDvNZ 📝 Scorecard: https://t.co/6iWNedCshI pic.twitter.com/ts9sv5vYpZ
— ICC (@ICC) January 29, 2023
.@surya_14kumar hits the winning runs as #TeamIndia secure a 6-wicket win in Lucknow & level the #INDvNZ T20I series 1️⃣-1️⃣
Scorecard ▶️ https://t.co/p7C0QbPSJs#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/onXTBVc2Wu
— BCCI (@BCCI) January 29, 2023
Vice-captain @surya_14kumar remained unbeaten in a tricky chase and bagged the Player of the Match award as #TeamIndia registered a 6-wicket victory in Lucknow 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/p7C0QbPSJs#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/LScLxZaqfq
— BCCI (@BCCI) January 29, 2023
हेही वाचंलत का?
- IND vs NZ 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी
- U19 Women’s T20 WC : टीम इंडियाच्या पोरी भारी, ब्रिटनला धूळ चारत विश्वचषकाला गवसणी
- Australian Open final : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, नदालच्या विश्वविक्रमाची बरोबरी