Latest
Akshar Patel : के.एल.राहूल पाठोपाठ अक्षर पटेल लग्न बंधनात… (व्हिडिओ)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेलने गुरुवारी (दि.२६) वडोदरा येथे मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू त्याच्या लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी झाला नव्हता. अक्षरने त्याच्या लग्नाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले नसले तरी ट्विटरवरील अनेक चाहत्यांनी काही छायाचित्रे शेअर केली आहेत. (Akshar Patel)
मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मेहा पटेल ही व्यवसायाने डायटिशियन आहे. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्याने आपल्या गोलंदाजीमुळे व फलंदाजीने छाप पाडली. लग्नानंतर अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियात परतणार आहे. (Akshar Patel)
हेही वाचा;
- पुणे: सरपंचांना योजनेची माहिती असणे आवश्यक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील; जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन
- तरुणाचा प्रताप: रागाच्या भरात स्वत:च्याच बंगल्याला, गाडीला आग लावली अन् तमाशात जाऊन बसला
- तू खुप आवडते, माझ्या सोबत मैत्री कर, तू नकार दिला तर जिवंत सोडणार नाही; तोंडावर अॅसीड फेकण्याची धमकी देत बलात्कार
- पुणे: आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर फेस; नागरिकांच्या जीवाशी खेळ
- Under 19 World Cup : भारतीय महिला संघाची 'वर्ल्डकप' फायनलमध्ये धडक! सेमीफायनलमध्ये किवींना चिरडले

