Rohit on Bumrah : बुमराहच्या फिटनेसवरून कर्णधार रोहितचे मोठे विधान, म्हणाला... | पुढारी

Rohit on Bumrah : बुमराहच्या फिटनेसवरून कर्णधार रोहितचे मोठे विधान, म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने क्लीन स्वाईप दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठे विधान केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारत एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या स्थानावर होता आणि किवीज अव्वल स्थानावर होते. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा धुव्वा उडवल्यानंतर भारताने क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्यासाठी तीन स्थानांचा फायदा झाला. (Rohit on Bumrah)

या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आला असून इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताने तिसरा सामनाही जिंकून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. आता इंग्लंड दुसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. (Rohit on Bumrah)

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारत आधीच अव्वल क्रमांकाचा संघ होता आणि आता एकदिवसीय सामन्यांमध्येही नंबर वन बनला आहे, परंतु कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले की, या वर्षाच्या शेवटी भारतात होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकावर संघाचे लक्ष आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर रँकिंगने काही फरक पडत नाही.

रोहित म्हणाला, विश्वचषकासाठी आम्हाला तयार व्हायचे आहे. आम्ही घरच्या मैदानावर खेळणार आहोत, काही आव्हाने आहेत ज्यासाठी आम्हाला तयार राहण्याची गरज आहे. काही कॉम्बिनेशन्स आम्हाला चाचणी करणे आवश्यक आहे. यामुळे आम्हाला विश्वचषक स्पर्धेपूर्वी सामन्यांवर लक्ष द्यायचे आहे.

रोहित म्हणाला, जेव्हा आम्ही T20 विश्वचषकमध्ये खेळत होतो, तेव्हा आशिया चषक वगळता आम्ही सर्व काही जिंकले होते. पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला चांगली कामगिरी करण्याचा खूप विश्वास होता. दुर्दैवाने, चांगली कामगिरी करण्यात अपयशस्वी ठरलो. पण, आमच्यासाठी वनडे विश्वचषकाच्या निमित्ताने आणखी एक संधी निर्माण झाली आहे. आम्हाला या स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे.
भारतीय संघातील महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराह पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. त्याने सप्टेंबर 2022 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती, परंतु पाठदुखीच्या दुखण्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. यासह तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेतूनही बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर – गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनाही तो मुकणार आहे.

रोहितने बुमराहच्या पुनरागमनावर म्हणाला की, तो यावर्षी भारतीय कॅलेंडरचा विचार करून घाईघाईने निर्णय घेणार नाहीत ज्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि त्यानंतर वनडे विश्वचषक यांचा समावेश आहे. तो म्हणाला, बुमराहबद्दल मला याक्षणी फारशी खात्री नाही. पहिल्या दोन कसोटींसाठी तो उपलब्ध नाही. मला आशा आहे की तो पुढील दोन कसोटी खेळेल, पण पुन्हा, आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही.

पाठीच्या दुखापती नेहमीच गंभीर असतात. त्यानंतर (बॉर्डर-गावसकर मालिका) भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही देखरेख ठेवणार आहोत. आम्ही एनसीएमधील फिजिओ आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहोत आणि आम्ही त्यांचे सतत ऐकत आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारत रांची येथे २७ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची T20I मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तयारीसाठी T20I मालिकेतून बाहेर पडलेल्या रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल.

हेही वाचा;

Back to top button