Australian Open 2023 : सानिया मिर्झा- रोहन बोपण्‍णाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक | पुढारी

Australian Open 2023 : सानिया मिर्झा- रोहन बोपण्‍णाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मिश्र उपांत्य फेरीत त्‍यांनी  ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यू.एस.ए.च्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७(७)-६(५), ६(५)-७(७), १०-६ असा पराभव केला. तत्पूर्वी, भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला (सामना रद्द झाला) होता. (Australian Open 2023)

आता कारकिर्दीचा शेवट गोड करण्‍यासाठी सानिया मैदानात उतरणार

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी उरुग्वे आणि एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया या जपानी जोडीचा ६-४, ७-६, ११- ९ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. सानियाने आपले हे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे आधीच जाहीर केले आहे होते. अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर सानिया आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. (Australian Open 2023)

उपांत्य फेरीच्या सामन्‍यात सानिया आणि रोहन यानी आक्रमक सुरुवात करत पहिला सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. मात्र, त्याने दुसरा सेटमध्ये त्यांचा ६-७ अशा फरकाने पराभव झाला. यानंतर सानिया आणि बोमण्णा यांनी शानदार पुनरागमन करत तिसरा सेट १०-६ अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

यंदाच्‍या ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत सानिया – बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरीत आतापर्यंत फक्त एक सेट गमावला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांना दुसऱ्या सेटमध्ये एक गुणाच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही पुरुष दुहेरी जोडी पहिल्याच फेरीतून बाहेर पडली होती. महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया आणि कझाकिस्तानच्या ॲना डॅनिलिना यांना पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा;

Back to top button