WPL 2023 : महिला IPL चे झाले ‘बारसे’, दिले ‘हे’ नाव; जय शहा यांची घोषणा

WPL 2023 : महिला IPL चे झाले ‘बारसे’, दिले ‘हे’ नाव; जय शहा यांची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's Premier League : भारतात खेळल्या जाणाऱ्या महिला आयपीएलचे नाव समोर आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली. या लीगला महिला प्रीमियर लीग असे नाव देण्यात आले आहे. बुधवारी शहा यांनी या लिगमधील पाच संघांच्या फ्रेंचायझींची नावे जाहीर केली. लीगच्या पहिल्या सत्रात अहमदाबाद, मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि लखनौचे संघ खेळताना दिसतील.

जय शहा यांनी दिली माहिती –

महिला आयपीएलचे नाव जाहीर करताना बीसीसीआयचे सचिव शाह यांनी ट्विट केले की, बीसीसीआयने या लीगचे नाव महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ठेवले आहे. आता हा नवा प्रवास सुरू होत आहे. यामुळे महिला क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे.' (Women's Premier League)

आणखी एका ट्विटमध्ये जय शहा म्हणतात की, 25 जानेवारी 2023 हा क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस ठरला आहे. कारण महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनाच्या बोलीने 2008 मध्ये पुरुषांच्या आयपीएलच्या उद्घाटन बोलीचा विक्रम मोडला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. आम्हाला बोलीमधून एकूण 4669.99 कोटी रुपये मिळाले. महिला क्रिकेटमधील क्रांतीची ही सुरुवात आहे. (Women's Premier League)

'महिला क्रिकेटमध्ये सुधारणा होईल'

'महिला प्रीमियर लीगच्या माध्यमातून महिला क्रिकेटमध्ये सुधारणा होईल. केवळ आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठीच नाही तर संपूर्ण क्रीडा समुदायासाठी हा परिवर्तनाच्या प्रवासाचा मार्ग आहे. यामुळे महिला क्रिकेटमध्ये आवश्यक सुधारणा होतील. जे एक सर्वसमावेशक इकोसिस्टम सुनिश्चित करेल ज्याचा प्रत्येक भागधारकाला फायदा होईल,' असेही मत शहा यांनी व्यक्त केले. (Women's Premier League)

महिला IPL मध्ये अदानी Vs अंबानी, BCCI ची कोट्यवधींची कमाई

महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) चा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या सत्रात पाच संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यातील पाचही संघांची विक्री करून कोट्यवधींची कमाई केली आहे. या पाच संघांच्या विक्रीरून बीसीसीआयला 4669.99 कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती सचिव जय शहा यांनी ट्विट करून दिली. त्यांनी महिला आयपीएलचे अधिकृत नाव आता महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) असे बदलून सलग तीन ट्विट केले आहेत.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ आणि दिल्ली हे पाच संघ खेळतील. त्यांचा लिलाव करण्यात आला आहे. यातील अहमदाबाद संघासाठी अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावली. तर मुंबईचा संघ रिलायन्स ग्रुपशी सलग्न असणा-या इंडियाविन स्पोर्ट्सने विकत घेतला आहे. म्हणजेच यावेळी महिलांच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुपचे संघ आमनेसामने दिसणार आहेत.

पाच संघ कोणी किती किमतीत विकत घेतले?

1. अदानी स्पोर्ट्सलाइन प्रा. लि. : अहमदाबाद : 1289 कोटी रु.
2. इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लि. (रिलायन्स ग्रुप) : मुंबई : 912.99 कोटी रु.
3. रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लि. : बंगळूर : 901 कोटी रु.
4. JSW GMR क्रिकेट प्रा. लि. : दिल्ली : 810 कोटी रु.
5. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रा. लि. : लखनौ : 757 कोटी रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news