IND VS NZ 3rd ODI : ‘या’ खेळाडूंना मिळणार ‘विश्रांती’ | पुढारी

IND VS NZ 3rd ODI : 'या' खेळाडूंना मिळणार 'विश्रांती'

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदुरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. आता तिसर्‍या सामन्‍यात विजय मिळवत न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्‍यात भारतीय संघात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या वन-डे सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले होते. या सामन्‍यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विश्रांतीसाठी  दिला जाण्‍याची शक्‍यता आहे. (IND VS NZ 3rd ODI)

तिसऱ्या ‘वनडे’मध्ये होणार बदल

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला यांना एकदिवसीय सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो. कारण पुढील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या वेगवान गोलंदाजांच्या जागी उमरान मलिकला संधी दिली जाऊ शकते. उमरानसोबतच शाहबाज अहमदलाही या सामन्यात संधी दिली जाणार असल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.  (IND VS NZ 3rd ODI)

न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : (IND VS NZ 3rd ODI)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

भारत विरुद्ध न्युझीलंड एकदिवसीय मालिका

पहिला सामना – भारताने १२ धावांनी विजय मिळवला.
दुसरा सामना – भारताने न्युझीलंडचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला.
तिसरा सामना – २४ जानेवारी इंदुर येथे खेळवला जाणार आहे. (IND VS NZ 3rd ODI)

हेही वाचा :

Back to top button