

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या तयारीत असलेल्या टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताने शनिवारी रायपूर येथे खेळविण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. म्हणजेच ही मालिकाही भारताने खिशात घातली असून आता या मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला होणार आहे. (IND VS NZ ODI)
टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही, विशेषत: द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाचे रेकॉर्ड मजबूत होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकली आहे आणि यापैकी बहुतेक मालिका त्याने विरोधी संघाची पार धूळधाण केली आहे. म्हणजेच भारताला त्याच्या घरात पराभूत करणे फारसे सोपे नाही त्याने आपला किल्ला अभेद्य ठेवला आहे. (IND VS NZ ODI)
1. न्यूझीलंड विरुद्ध – टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे (3 सामन्यांची मालिका) 2023
2. श्रीलंका विरुद्ध – टीम इंडिया 3-0 ने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2023
3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध – टीम इंडिया 2-1 ने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2022
4. वेस्ट इंडिज विरुद्ध – भारत 3-0 ने जिंकला (3 सामन्यांची मालिका) 2022
5. इंग्लंड विरुद्ध – भारताने 2-1 फरकाने जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2021
6. ऑस्ट्रेलिया विरुद्ध – भारताने 2-1 अशी जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2020
7. वेस्ट इंडिज विरुद्ध – भारताने 2-1 मालिका जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2020
8. ऑस्ट्रेलिया विरुद्ध – भारताने 2-3 मालिका गमावली (5 सामन्यांची मालिका) 2019
9. वेस्ट इंडीज विरुद्ध – भारताने 3-1 मालिका जिंकली (5 सामन्यांची मालिका) 2019
10. श्रीलंका विरुद्ध – भारताने 2-1 अशी मालिका जिंकली (3 सामन्यांची मालिका) 2018
न्यूझीलंडवर मात
न्यूझीलंड सध्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पण या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल झाला. (IND VS NZ ODI)
रायपूरमधील दुसऱ्या वनडेबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने येथे 8 विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 108 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, हार्दिक पांड्याने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. रोहित शर्माने फलंदाजीत 51 धावांची अप्रतिम खेळी केली, तर शुभमन गिल 40 धावा करत नाबाद राहिला.
जर आपण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय विक्रमावर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 115 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 57 सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला.
अधिक वाचा :