Weather Alert : मराठवाडासह विदर्भावर पावसाचे ‘ढग’! हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा | पुढारी

Weather Alert : मराठवाडासह विदर्भावर पावसाचे ‘ढग’! हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उशिरा का होईना पण, सर्वत्र थंडीची हुडहुडी वाढली होती. नुकत्याच सुरु झालेल्या थंडीला सामोरे जात असताना आता पुन्हा पुढील आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीव्र ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा परिणाम देशात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिमालय आणि उत्तर भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम मराष्ट्रात सुद्धा जाणवणार असून मराठवाडासह विदर्भात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Alert)

आयएमडीचे शास्त्रज्ज्ञ के. एस. होसालिकर यांनी याबाबदचे ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये मराठवाडा, विदर्भासह परिसरात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच या काळात ढगाळ वातावरण राहणार आहे. (Weather Alert)

तीव्र ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा पश्चिम हिमालयावर (Indian weather) परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयात जाणवणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात २४ ते २५ जानेवारी दरम्यान मुसळधार तर दिल्लीत २४ ते २६ जानेवारी दरम्यान ढगाळ हवामानासह तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ एसएस रॉय यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्‍थेशी बोलताना व्‍यक्‍त केला. (Weather Alert)

उत्तरेकडील पंजाब, छत्तीसगढ, बिहार, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशमधील पूर्व भागातही काही प्रमाणात पाऊस किंवा बर्फवृष्टीचा इशारा (Indian weather) हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या भागात दाट धुके असणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर उत्तर भारतात थंडीची लाट येणार नसल्याचेही हवामान विभागाने स्‍पष्‍ट केले.

सध्या तापमानात (Indian weather) घट जाणवत आहे. असेच तापमान पुढील पाच दिवस राहील. मात्र पुढील आठवड्याच्या शेवटी किमान तापमान वाढणार असून, कमाल तापमान कमी होऊन थंडी पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.


अधिक वाचा :

Back to top button