

विजेतेपदाचा एक संभाव्य दावेदार असलेल्या तृतीय मानांकित ग्रीसच्या त्सित्सिपासने नेदरलँडच्या टेलॉन गरिक्सपूरला पराभूत केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. तो म्हणाला, येथील टोकाचे बदलते हवामान, पाऊस उकाडा, थंडी आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे सामने हा खेळाचाच एक भाग आहे. त्यामुळे सामन्याला एक किनार मिळते, कथा बनते, त्याने रंगत वाढते. आमचा दुसरा सेट खडतर होता. मी संभ्रमात पडलो, पण निभावून गेलो याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ही ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. तथापि येथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कमालीची स्वच्छता. (Stefanos Tsitsipas)
दैनंदिन 40 हजारांहून अधिक शौकीन इथे खेळाबरोबरच पोट तृप्त करण्यासाठी विविध खाद्य पेयावर दिवसभर ताव मारत असतात. अनेक प्रकारच्या खाद्य, पेयांचे असंख्य स्टॉल्स जागोजागी उपलब्ध आहेत. या परिस्थितीतही कुठेही कागदाचे कपटे, प्लास्टिक ग्लास, खाद्याचे बॉक्स, पडलेले आढळले नाहीत. अन्नपदार्थ कोठेही सांडल्याचे दिसले नाही. पिण्याचे पाणी सांडलंय, रिकाम्या बाटल्या फेकल्या आहेत, असे चित्र कुठेही दिसले नाही याचा उल्लेख करावाच लागेल. (Stefanos Tsitsipas)
– उदय बिनीवाले
हेही वाचा;