धोनी-कोहलीच्या मुलींवर अश्लील कमेंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

धोनी-कोहलीच्या मुलींवर अश्लील कमेंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या मुलींवर केलेल्या असभ्य टिप्पणीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या शाखा आयएफएसओने गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या ट्विटर अकाऊंटची चौकशी सुरू केली असून नोटीसही जारी केली आहे.

या प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर हँडलवर आयएफएसओने तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे. एजन्सीने म्हटलंय की, क्रिकेटपटू विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या मुलींबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी नोटीस पाठवल्यानंतर आयएफएसओ म्हणजेच विशेष सेलच्या युनिटने एफआयआर नोंदवला आहे. तसेच, एजन्सीने माहिती दिली आहे की दिल्ली पोलिस मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरकडे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

काय आहे प्रकरण…

भारतीय क्रिकेटपटू एम. एस. धोनी आणि विराट कोहली या दोघांच्या मुलींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

वामिका कोहली आणि झिवा धोनी सिंग यांच्याविरोधात सोशल मीडियावर काही युजर्सनी अश्लील कमेंट केल्या होत्या. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांनी नाराजी व्यक्त करत दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली होती.

स्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘काही ट्विटर अकाऊंट्सवर देशातील दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्या मुलींचे फोटो पोस्ट करून अश्लील कमेंट करत आहेत. 2 वर्षाच्या आणि 7 वर्षांच्या मुलींबद्दल अशा ओंगळ गोष्टी? तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या मुलीवर अत्याचार कराल का? असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांना नोटीस बजावत आहे’’ अशी माहिती दिली होती.

स्वाती मालीवाल यांनी क्रिकेटपटू विराट कोहली आणि एम. एस. धोनी यांच्या मुलींबद्दल ट्विटरवर अपमानास्पद आणि असभ्य टिप्पण्या करणा-यांविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करण्याची नोटीस दिल्ली पोलिसांना दिली होती. असे पुन्हा कोणी करण्याची हिंमत करणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी! असेही मालीवाल यांनी म्हटले होते.

 

 

Back to top button