IND vs SL ODI : भारताने तब्बल ३१७ धावांनी उडवला श्रीलंकेचा धुव्वा | पुढारी

IND vs SL ODI : भारताने तब्बल ३१७ धावांनी उडवला श्रीलंकेचा धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताने श्रीलंकेसमोर ३९१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या झंझावती शतकी खेळीच्या जोरावर ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. वनडेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. शुभमनने ९७ चेंडूत ११६ धावांची खेळी केली.  कोहलीने ११० चेंडूत १६६ धावा करून नाबाद राहिला. (IND vs SL ODI)

श्रीलंकेची फलंदाजी

दुनिथ वेललागेच्या रूपात श्रीलंकेला आठवा धक्का

सामन्याच्या १६ व्या ओव्हरमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज शमीने वेललागेच्या रूपात श्रीलंकेला आठवा धक्का दिला. तो ३ धावा करून बाद झाला.

फिरकीने दिला सातवा धक्का 

सामन्याच्या १५ व्या ओव्हरमध्ये भारताचा गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीने श्रीलंकेला सातवा धक्का दिला. त्याने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाला ११ धावांवर बाद केले. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या  ७ बाद ५० धाव इतकी आहे.

श्रीलंकेला सहावा धक्का

श्रीलंकेला १२ व्या षटकात ३९ धावांवर सहावा धक्का बसला. उत्कृष्ट गोलंदाजीनंतर सिराजचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. त्याने चमिका करुणारत्नेला धावबाद केले. या सामन्यात सिराजने चार विकेट घेतल्या आहेत. त्याने अविष्का, नुवानिडू, मेंडिस आणि हसरंगा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत

सामन्याच्या १० व्या ओव्हरमध्ये  हसरंगाला बाद करत सिराजने श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने हसरंगाने १ धावांवर बाद केले. यावेळी श्रीलंकेचा स्कोर ५ बाद ३७ धावा इतक आहे. या विकेटसह  सिराजने सामन्यात वैयक्तिक ४ बळी घेतले आहेत.

सिराजने दिला श्रीलंकेला चौथा धक्का

सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज सिराजने वैयक्तिक तिसरा बळी घेत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. त्याने नुवानिडू फर्डिनांडोला बाद केले. तो १९ धावाकरून बाद झाला. यावेळी श्रीलंकेची धावसंख्या ७.३ ओव्हरमध्ये ४ बाद ३६ धावा असा आहे.

शमीने दिला श्रीलंकेला तिसरा धक्का

सिराजने पाठोपाठ  दोन फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या असलंकाला शमीने मैदानात फार काळ टिकू दिले नाही. शमीने असलंकाला अक्षरकरवी झेल बाद केले. असलंका १ धाव करून बाद झाला.

श्रीलंकेला पाठोपाठ धक्के

श्रीलंकेकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात अविष्का फर्नांडो आणि नुवानिडू फर्डिनांड मैदानात उतरले. डावाच्या दुसऱ्या षटकात अविष्का फर्नांडो ७ बाद धावा करून झाला. त्याला भारताचा वेगवान गोलंदाज सिराजने १ धाववर बाद केले. त्याच्या पाठोपाठ श्रींलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस ४ धावा करून बाद झाला. त्याला देखील सिराजने बाद करत श्रीलंकेला पाठोपाठ दोन धक्के दिले.

तत्पूर्वी, 

सामन्याच्या सुरूवातीला टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात उतरले. या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. दहाव्या षटकापर्यंत भारताने एकही विकेट न गमावता ७५ धावा केल्या. भारताला पहिला धक्का १६ व्या षटकात ९५ धावांवर बसला. कर्णधार रोहित शर्मा ४९ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याला चमिका करुणारत्ने याने अविष्काच्या हाती झेलबाद केले. रोहितने आपल्या खेळीत दोन षटकार आणि ३ चौकार मारले. शुभमन गिलने वनडे कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. त्याने ५२ चेंडूत ५० धावा केल्या. (IND vs SL ODI)

शुभमचे कारकिर्दीतील दुसरे शतक

सलामीवीर शुभमने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने ८९ चेंडूत शतकाला गवसणी घातली. तिसाव्या षटकारपर्यंत भारताने १ बाद २०० चा टप्पा पार केला. तर दोन्ही सेट फलंदाजांनी आपले अर्धशतक आणि शतकपूर्ण केले. भारताला ३४ व्या षटकात मोठा झटका बसला. शतकी खेळी करणारा व भारताला मजबूत स्थितीत पोहचवणारा सलामीवीर शुभमन गिल ११६ धावा करुन बाद झाला. ३३ व्या षटकातील ३ चेंडूवर तो स्टेप ऑऊट होऊन मोठा फटका मारण्याच्या नादात बोल्ड झाला. गोलंदाज रजिताने त्याला बाद केले. शुभमन यान १४ चौकार तर २ षटकार ठोकले.

शुभमन बाद झाल्यानंतर विराटने धावगती वाढवण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताची धावसंख्या भक्कम केली. या आक्रमक खेळीने त्याने आपला १५० धावांचा टप्पा पार केला. त्याने चेॆडूत नाबाद १६६ धावा केल्या. सामन्यात सुर्यकुमार आणि राहूल मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. विराट आणि शुभमन आणि विराटच्या धुवॉधार खेळीने भारताने श्रीलंकेला विजयासाठी ३९१ धावांचे आव्हान दिले आहे.

हेही वाचा;

Back to top button