Murali Vijay : …म्हणून मी परदेशात संधी शोधतोय – मुरली विजय | पुढारी

Murali Vijay : ...म्हणून मी परदेशात संधी शोधतोय - मुरली विजय

चेन्नई; वृत्तसंस्था : क्रिकेटपटू 30 वर्षांचा झाला की भारतात तो खेळाडू वयस्कर समजला जातो. बीसीसीआयबरोबरचा आपला वेळ आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे मी परदेशात संधी शोधत आहे, असे मत भारताचा क्रिकेटपटू मुरली विजय याने व्यक्त केले आहे. (Murali Vijay)

भारताचा अनुभवी सलामीवीर मुरली विजय अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. तसेच त्याने सप्टेंबर 2020 मध्ये शेवटचा देशांतर्गत सामना खेळला. गेल्या वर्षभरापासून तो स्पर्धात्मक क्रिकेटचा भाग नाही. तो तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. आता मुरली विजयने आपल्या करिअरबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुरली विजय पुढे म्हणाला, भारतात 30 वर्षांच्या वयानंतर लोक आम्हाला रस्त्यावर चालणारा 80 वर्षांचा वयस्कर समजतात. (Murali Vijay)

विजयने भारतासाठी 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 38 वर्षीय विजयला क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आहे. पण तो भारतात नाही तर परदेशात संधी शोधत आहे.

बीसीसीआयसोबतचा आपला वेळ संपला आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. स्पोर्टस्टारवरील विकली शो डब्ल्यू व्ही रमन दरम्यान मुरली विजय म्हणाला, बीसीसीआय (हसत) सोबतचा माझा वेळ जवळजवळ संपला आहे आणि मी परदेशात संधी शोधत आहे. मला काही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आहे. विजयने इंग्लंडमध्ये एसेक्ससाठी काऊंटी क्रिकेट खेळला आहे.

अधिक वाचा :

Back to top button