Rashid Khan: अफगाणिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयानंतर राशीद खानने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा | पुढारी

Rashid Khan: अफगाणिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयानंतर राशीद खानने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अफगाणिस्तानचा प्रसिद्ध लेग-स्पिनर राशीद खानने (Rashid Khan) एक ट्विट करत ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियासाठी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणे इतके अस्वस्थ होत असेल. तर ऑस्ट्रेलियातील बीबीएल या स्पर्धेत खेळण्याबाबत मी गांभीर्याने विचार करेन, असे रशीदने म्हटले आहे.

या वर्षाच्या अखेरीस यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर त्यांनी देशातील महिला आणि मुलींवर अनेक निर्बंध लादले आहेत. तालिबानच्या या निर्णयाच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर राशीद खानने (Rashid Khan) नाराजी व्यक्त करत आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले आहे. यामध्ये रशीदने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाने आमच्याविरुद्ध मालिका न खेळण्याचा निर्णय घेतल्याने मी खरोखर निराश झालो आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना खूप अभिमान वाटतो आणि आम्ही या खेळाने जागतिक स्तरावर चांगली प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतल्याने आमच्या विकासाच्या प्रवासात हा एक धक्का आहे. जर ऑस्ट्रेलियासाठी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणे इतके अस्वस्थ होत असेल. तर बीबीएल या स्पर्धेत खेळण्याबाबत मी खूप गांभीर्याने विचार करेन.

दरम्यान, आता राशीद खान पुढे काय निर्णय घेणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, राशीदच्या या निर्णयाचे भारतासह आशियातील क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button