

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचा कर्णधार शानकाने २२ चेंडूत नाबाद ५६ धावांची शानदार खेळी करत भारताला २०७ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेने शेवटच्या ५ षटकात तब्बल ७७ केल्या. भारताकडून उमरान मलिकने ३ तर अक्षर पटेलने २ गडी बाद केले. वेगवान गोलंदाज अर्शदीप चांगली गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. त्याने दोन षटकात ५ नो बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी १ नो बॉल टाकला. भारताने नो बॉल अन् फ्री हिटवर २२ हून अधिक धावा केल्या.
मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेच्या सलामीवीर कुसल मेंडीस आणि निसंका सलामीजोडीने फटकेबाजी करत ८ षटकात तब्बल ८० केल्या. अखेर अर्शदीपच्या नो बॉल आणि फ्री हिटमधून चहलने सावरत मेंडीसला बाद केले. त्याने ३१ चेंडूत ५१ धावांची आक्रमक खेळी केली.
उमरान मलिक आणि अक्षर पटेल यांनी लंकेची मध्यम फळी फोडली. यामध्ये अक्षरने दोन तर उमरानने महत्वाची असलंकाची विकेट घेतली. असलंकाने १९ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने वानिंदू हसरंगाचा देखील त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला. तो शून्य धावांवर बाद झाला.
भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्या पुढे श्रीलंकेची अवस्था ६ बाद १३८ धावा केली होती. मात्र शेवटच्या ४ षटकात दसुन शानकाने चेंडूत अर्धशतक ठोकत लंकेला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. त्याच्या या शानदार खेळीने भारताला २०६ धावांचे आव्हान दिले.
हेही वाचा;