India vs Sri Lanka : नवे वर्ष.. नवा संघ… नवी मालिका! भारताचा आज श्रीलंकेशी पहिला टी-२० सामना

India vs Sri Lanka : नवे वर्ष.. नवा संघ… नवी मालिका! भारताचा आज श्रीलंकेशी पहिला टी-२० सामना
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : टीम इंडिया 2023 या नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नव्या दमाचा संघ निवडला आहे. बांगला देशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला होता. मात्र, आता मंगळवार (3 जानेवारी) पासून खेळाडूंच्या क्रिकेट वेळापत्रकाला श्रीलंका दौर्‍यापासून सुरू होणार आहे. नवीन वर्षात मोठ्या बदलांसह भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंसह टी-20 मालिकेत श्रीलंकेशी सामना करेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तो टीम इंडियाचा कर्णधार होता आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्माच्या अंगठ्याची दुखापत बरी होण्यासाठी जास्त वेळ लागणार होता. अशा परिस्थितीत हार्दिककडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पण, रोहित वन-डे मालिकेतून पुनरागमन करणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवणार आहे. श्रीलंकेने यापूर्वी भारताचा दौरा केला तेव्हा त्यांना एकही टी-20 सामना जिंकता आला नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये श्रीलंका आशियाई चॅम्पियन आहे.

श्रीलंकेविरुद्धची मालिकाही काही अर्थाने खास आहे. यावेळी सूर्यकुमार यादवला उपकर्णधार बनवण्यात आले असून 2022 मधील चमकदार कामगिरीसाठी त्याला हे बक्षीस देण्यात आले आहे. तसेच, इशान किशन आणि संजू सॅमसनला ऋषभ पंतची जागा भरण्याची संधी आहे, जो कदाचित पुढील 6 महिने क्रिकेटपासून दूर असेल. कर्णधार हार्दिक पंड्या आक्रमक क्रिकेट खेळतो आणि संघाकडूनही त्याचीच अपेक्षा असते.

संघ यातून निवडणार : (India vs Sri Lanka)

भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समराविक्रम, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तिक्षाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसून रजिथा, दुनिथ वेलगे, प्रमोद मुधुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news