Georgina Ronaldo : जॉर्जिनाने रोनाल्डोला भेट दिली आलिशान रोल्स रॉइस कार! किंमत जाणून थक्क व्हाल

Georgina Ronaldo : जॉर्जिनाने रोनाल्डोला भेट दिली आलिशान रोल्स रॉइस कार! किंमत जाणून थक्क व्हाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Georgina Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. अलीकडेच कतार येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून त्याचा पोर्तुगालचा संघ बाहेर पडला. रोनाल्डो 5 फेब्रुवारीला 38 वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत पुढील विश्वचषक खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण असेल. त्यामुळे 2028 मध्ये अमेरिका-मेक्सिको-कॅनडा येथे खेळल्या जाणा-या वर्ल्डकपमध्ये तो खेळताना दिसणार नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव केल्यानंतर रोनाल्डो निराश झाला. मैदान सोडताना त्याला अश्रू अनावर झाले. पाणावलेले डोळे पुसत जातानाचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आता त्या घटनेनंतर बराच काळ उलटून गेला असून पराभवाचे दु:ख विसरून रोनाल्डो कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसला. याचदरम्यान, त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जने रोनाल्डोला (Georgina Ronaldo) सर्वोत्तम भेट दिली असल्याचेही समोर आले आहे.

जॉर्जियाने रोनाल्डोला एक आलिशान कार रोल्स रॉयस डॉन भेट दिली आहे. ज्याची किंमत तब्बल 300,000 पौंड (सुमारे 3 कोटी रुपये) आहे. जॉर्जियाने तिच्या मुलांनाही छान भेटवस्तू दिल्या.

जॉर्जिया आणि रोनाल्डो (Georgina Ronaldo) 2016 पासून एकत्र आहेत. या ख्रिसमसच्या निमित्ताने जॉर्जियाने मेणबत्त्या पेटवून तिचे संपूर्ण घर मिणमिणत्या प्रकाशात उजळवले. सणाला तिने आकर्षक असा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते.

कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या अर्जेंटिनाने पटकावले. या विश्वचषकादरम्यानही जॉर्जिया आपल्या मुलांसह कतारला पोहोचली होती. तिथे तिने पती रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघाला पाठिंबा दिला.

कतार फिफा विश्वचषक रोनाल्डोसाठी अजिबात चांगला ठरला नाही. नुकताच त्याने इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडला सोड चिठ्ठी दिली. आता अशा बातम्या येत आहेत की, रोनाल्डो लवकरच सौदी अरेबियातील एका क्लबसोबत करार करू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news