Alex Carey Century : बॉक्सिंग डे कसोटीत ॲलेक्स कॅरीचे विक्रमी शतक! | पुढारी

Alex Carey Century : बॉक्सिंग डे कसोटीत ॲलेक्स कॅरीचे विक्रमी शतक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : alex carey century : ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करून बॉक्सिंग डे कसोटीच्या तिस-या दिवशी शतक झळकावले. कांगारूं संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावणारा तो इतिहासातील दुसरा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. (alex carey century)

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कॅरी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्यावेळी संघाची धावसंख्या 400 होती. त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी करून स्वत:चे पहिले शतक तर पूर्ण केलेच पण त्याचबरोबर त्याने संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. (alex carey century vs south africa boxing day test)

कॅरीने 14 कसोटी सामन्यांच्या 19 व्या डावात तीन आकडी धावसंख्या गाठली. त्याने कसोटी कईयरमधील पहिले शतक 133 चेंडूत पूर्ण केले. त्याबरोबर कॅरीने कॅमेरून ग्रीनच्या साथीने आठव्या विकेटसाठी 112 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 8 बाद 575 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिला डाव घोषित केला. द. आफ्रिकेने पहिल्या डावात 189 धावा केल्या होत्या. त्यामुळे यजमान कांगारू संघाला पहिल्या डावात 386 धावांची आघाडी मिळाली. (alex carey century vs south africa boxing day test)

कॅरीच्या आधी रॉड मार्शने ‘अशी’ कामगिरी केली

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांनी कॅरीपूर्वी असा पराक्रम केला होता. मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून 96 कसोटी आणि 92 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यावर्षी 4 मार्च रोजी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

कॅरी हा टिम पेनचे उत्तराधिकारी

टीम पेनचा उत्तराधिकारी म्हणून अॅलेक्स कॅरीची निवड करण्यात आली आहे. नुकतीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या पेनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकही शतक झळकावता आले नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघ 3 सामन्यांच्या मालिकेवर कब्जा करेल. ऑस्ट्रेलियाने गाबा कसोटी 6 गडी राखून जिंकली.

Back to top button