BANvsIND 2nd Test : भारताचा पहिला डाव 314 धावांत संपुष्टात | पुढारी

BANvsIND 2nd Test : भारताचा पहिला डाव 314 धावांत संपुष्टात

मीरपूर; वृत्तसंस्था : भारत आणि बांगला देश यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याचा आज शुक्रवारी दुसरा दिवस आहे. भारताने गुरुवारी दिवसाची 14 षटके शिल्लक असताना आपला पहिला डाव खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी के एल राहुल १० आणि शुभमन गिल २० धावा काढून माघारी परतला. तैजुल इस्लामने दोघांची विकेट घेतली. त्यानंतर ३१ व्या षटकांत बांगला देशच्या तैजुल इस्लामने भारताला तिसरा धक्का देत पुजाराला आउट केले. मोमिनलने त्याचा झेल टिपला. लंच ब्रेकपर्यंत भारताने ३ बाद ८६ धावा केल्या होत्या. ३८ व्या षटकांत तस्किन अहमदने विराट कोहलीला माघारी पाठवले. नारूल हसनने त्याचा झेल घेतला. विराटला केवळ २४ धावा करता आल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर जोडीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

भारताचा पहिला डाव 314 धावांत संपुष्टात

भारताचा पहिला डाव 314 धावांत संपुष्टा आला. शाकिब अल हसनने सिराजला नुरुल हसनच्या हाती यष्टिचित करून भारताचा ऑलआऊट केला. सिराजने 15 चेंडूत सात धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने 87 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताची नववी विकेट

उमेश यादवने काही चांगले फटके खेळून आपली विकेट गमावली. तो 84 व्या षटकात तैजुल इस्लामने लिटन दास करवी त्याला झेलबाद केले. उमेशने 13 चेंडूत 14 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले.

भारताची आठवी विकेट

भारताची आठवी विकेट 286 धावांवर पडली. रविचंद्रन अश्विन 30 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. शाकिब अल हसनने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.

शाकिबचे भारताला दोन झटके

शाकिबने भारताला दोन झटके दिले. त्याने 71व्या षटकात अक्षर पटेलला (4) आणि त्यानंतर 73व्या षटकात श्रेयस अय्यरला () पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अय्यरलाही शतके पूर्ण करता आले नाही. त्याने 105 चेंडूत 87 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले.

ऋषभ पंतचे शतक 7 धावांनी हुकले

भारताची पाचवी विकेट यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या रूपाने पडली. त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. 105 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 93 धावांची खेळी करून पंत तंबूत परतला. 68 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मेहदी हसनने त्याचा डाव संपुष्टात आणला. नुरूलने पंतचा झेल पकडला. पंतने अय्यर सोबत पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली.

गुरुवारी पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली होती. बांगला देशचा संपूर्ण संघ 5 बाद 213 वरून 227 धावांवर तंबूत परतला. मोमिनूल हक वगळल्यास बांगला देशच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. आर. अश्विन व उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेटस् घेतल्या आणि भारताला कमबॅक करून दिले.

बांगला देशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी टीम इंडियाने मागील सामन्यातील हिरो कुलदीप यादवला वगळले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी दिली. 12 वर्षांनंतर कसोटी खेळणार्‍या उनाडकटने 15 व्या षटकात बांगला देशला पहिला धक्का देताना जाकिर हसनला (15) माघारी पाठवले. त्यानंतर आर अश्विनने सलामीवीर नजमूल शांतोला (4) पायचीत पकडले. शाकिब अल हसन (16), मुशफिकर रहीम (26) आणि लिटन दास (25) हेही फार कमाल करू शकले नाही. उमेश यादव, उनाडकट व अश्विन यांनी या तिघांना बाद केले आणि बांगला देशचा निम्मा संघ 172 धावांत माघारी पाठवला. मोमिनूल हकने अर्धशतकी खेळी करताना एकट्याने खिंड लढवली, पण उमेश यादवने बांगला देशला झटपट दोन धक्के देत मोमिनूलला बॅकफूटवर फेकले. मोमिनूल व मेहदी हसन मिराज यांची 106 चेंडूंतील 41 धावांची भागीदारी उमेशने तोडली. मेहदी (15) व नुसूर हसन (6) यांना उमेशने बाद केले. मोमिनूल 84 धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. बांगला देशचा संपूर्ण संघ 227 धावांवर माघारी परतला. उमेशने 25 धावांत 4 आणि अश्विनने 71 धावांत 4 विकेटस् घेतल्या. उनाडकटने दोन विकेटस् घेतल्या.

एका तपानंतर उनाडकटला मिळाली पुन्हा संधी

जयदेव पूर्ण 12 वर्षे, 2 दिवसांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील झाला. जयदेवने 16 डिसेंबर 2010 रोजी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो काल मैदानावर उतरला होता. जयदेवने दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी 118 कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. दुसरी कसोटी खेळण्यासाठी कोणत्याही भारतीयाची ही सर्वात मोठी प्रतीक्षा आहे. लाला अमरनाथ यांच्या दोन कसोटी सामन्यांमधील अंतर हे 12 वर्ष व 129 दिवसाचे होते. भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने बांगला देशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच अनोखा विक्रम केला.

राहुल द्रविड तेव्हा होते टीममेट

जयदेव उनाडकटने 16 डिसेंबर 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पदार्पण केले होते. तेव्हा राहुल द्रविड प्लेईंग इलेव्हनचा भाग होता. विराट कोहलीने तर तेव्हा पदार्पणही केले नव्हते नव्हते. भारताकडून हा एक विक्रम आहे, तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामन्यांसाठी संघाबाहेर असलेल्या खेळाडूंच्या यादीत तो दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. हा विक्रम इंग्लंडच्या गॅरेथ बॅटीच्या नावावर आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगला देश पहिला डाव : सर्वबाद 227 धावा. (मोमिनुल हक 84, लिटन दास 25. उमेश यादव 4/25, आर. अश्विन 4/71) भारत पहिला डाव : बिनबाद 19 धावा. (शुभमन गिल 14, के. एल. राहुल 3)

हे ही वाचा :

Back to top button