IND vs SL : भारताचे श्रीलंकेला १६३ धावांचे आव्हान

IND vs SL : भारताचे श्रीलंकेला १६३ धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजी करत श्रीलंकेला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले. वानखेडे येथे सुरू असलेल्या सामन्याच्या सुरूवातीला श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (IND vs SL)

सामन्यात पहिल्या चेंडूपासून इशान किशनने फटकेबाजी करत फलंदाजीला सुरूवात केली. यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये १६ धावा केल्या. इशान किशन प्रमाणे आक्रमक फलंदाजी करण्याच्या इराद्याने टी-२० सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने आपली धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात ७ धावाकरून बाद झाला. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला श्रीलंकेच्या तीक्षणाने आपल्या फिरकीने बाद केले. गिल बाद झाल्यानंतर मैदानात फंलदाजी करण्यासाठी सुर्यकुमार यादव मैदानात उतरला. त्याने देखील आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. परंतु, तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सामन्यातील ६ व्या ओव्हरमध्ये कलात्मक शॉट मारण्याच्या नादात तो राजपक्षेला सोपा कॅच देऊन बाद झाला. त्याला करुणारत्ने ७ धावांवर बाद केले. (IND vs SL)

सामन्याच्या सातव्या षटकात संजू सॅमसनला जीवनदान मिळाले. या संधीचा फायदा घेऊन संजू मोठी धावसंख्या उभी करेल असेल वाटत होते. परंतु, त्याला या संधीचा फायदा घेण्यात यश आले नाही. त्याने चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. त्याला धनंजयने ५ धावांवर बाद केले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची धावसंख्या ३ बाद ४७ होती. सामन्याच्या सातव्या षटकात संजू सॅमसनला जीवनदान मिळाले. या संधीचा फायदा घेऊन संजू मोठी धावसंख्या उभी करेल असेल वाटत होते. परंतु, त्याला या संधीचा फायदा घेण्यात यश आले नाही. त्याने चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. त्याला धनंजयने ५ धावांवर बाद केले. पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची धावसंख्या ३ बाद ४७ होती.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर त्याच्या जागी कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात उतरला. सुरूवातील त्याने आणि इशानने सावध भूमिका घेत फलंदाजी केली. यानंतर पुन्हा धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात इशान किशन २९ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. सामन्याच्या अकराव्या षटकात त्याला हसरंगाने धनंजयकरवी झेल बाद केले. सामन्याच्या पंधराव्या षटकांत कर्णधार पांड्या २९ धावा करून बाद झाला. त्याला मधूशंकाने मेंडिसकरवी झेलबाद केले. पांंड्या बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी आक्रमक खेळी करत संघाला शंभर धावांचा टप्पा पार करून दिला.

यावेळी गोलंदाजी करताना हसरंगा, धनंजया, करूणारत्ने, तीक्षणा आणि मधुशंका यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद करत भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

भारतीय संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा, दिलशान मदुशानका.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news