सांगली : खानापूर तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान

विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ४५ पैकी ३७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. तालुक्यात एकूण ७७.६४ टक्के मतदान झाले.

एकूण ६६ हजार ६८५ पैकी ५१ हजार ७७३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात २४ हजार ९५१ महिला आणि २६ हजार ८२२ पुरुषांचा समावेश आहे. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतसाठी ११८ प्रभागांमधील एकूण १३१ मतदान केंद्रामध्ये मतदान झाले. तालुक्यातील कार्वे आणि बेणापूर येथे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात थोड्या बिघाडानंतर मतदान यंत्रे बदलण्यात आली.

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या या टप्प्यामध्ये खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या होत्या. येथील आठ ग्रामपंचायती या अर्ज माघारी घेण्याच्या पूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. आज झालेल्या मतदानामध्ये एकूण ३७ सरपंचपदांसाठी ९४ तर २७० सदस्य पदांसाठी ५५३ उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील १३१ मतदान केंद्रामध्ये राखीवसह १४४ मतदान पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी असे सहा एका केंद्राचे पथक ठेवले होते. या सर्व केंद्रावर ६८६ कर्मचारी आणि राखीव ६५ कर्मचारी नेमण्यात आलेले होते. ३७ ग्रामपंचायतींसाठी नऊ सेक्टर अधिकारी तैनात ठेवले होते. सकाळी ७ : ३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली.

पहिल्या टप्प्यात मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी ११.३० पर्यंत २७.९७ टक्के मतदान झाले. तालुक्यातील कार्वे आणि बेणापूर येथे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील बिघाडानंतर मतदान यंत्रे बदलण्यात आली. तालुक्यातील आळसंद, कमळापूर, वाझर, बलवडी (भा), जाधवनगर, भाळवणी, कळंबी, पंचलिंगनगर, घानवड, हिंगणगादे, चिखलहोळ, वलखड, कार्वे, बामणी, कुर्ली, चिंचणी (मं), घोटी बुद्रुक, मोही, करंजे, रामनगर, बलवडी, हिवरे, सुलतानगादे, बेणापूर, बाणूरगड, ताडाचीवाडी, रेवणगाव, ऐनवाडी, जखिनवाडी, जाधववाडी, लेंगरे, भांबर्डे, भूड, वेजेगाव, वाळूज, सांगोले आणि जोंधळखिंडी या ३७ गावांमधील ग्रामपंचायतीचे कारभारी निवडण्यासाठी मतदान झाले. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तालुक्यात २७.९७ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या टप्प्यात काही अंशी मतदान प्रक्रिया मंदावली, परंतु शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले.

एकूण ३७ ग्रामपंचायतींपैकी पंचलिंगनगरमध्ये सर्वाधिक ९१.८४ टक्के तर घोटी बुद्रुकमध्ये सर्वांत कमी ६४.९० टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ४८.४५ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यानंतर चुरशीने मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७७.६४ टक्के मतदान झाले. गावनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – आळसंद – ८५.९० टक्के, कमळापूर – ८८.२८, वाझर – ८४.८२, बलवडी (भा) – ८४.४८, जाधवनगर – ८७.९४, भाळवणी – ७८.९२, कळंबी – ७८.६४, पंचलिंगनगर – ९१.८४, घानवड – ७८.१५, हिंगणगादे – ८२.७५, चिखलहोळ – ७८.३६, वलखड – ७२.९४, कार्वे – ८२.७०, बामणी – ७४.९५, कुर्ली – ७४.८४, चिंचणी (मं) – ७०.०१, घोटी बुद्रुक – ६४.९०, मोही – ८४.०४, करंजे – ७५.८१, रामनगर – ७६.४६, बलवडी (खा) – ७८.१४, हिवरे – ६८.७७, सुलतानगादे – ८१.९०, बेणापूर – ८३.२४, बाणूरगड – ७४.५३, ताडाचीवाडी – ७९.२८, रेवणगाव – ६६.७५, ऐनवाडी – ८०.७८, जखिनवाडी – ८४.११, जाधववाडी -७६.४०, लेंगरे – ७२.१७, भांबर्डे – ८१.५६, भूड – ७३.७०, वेजेगाव – ७७.२०, वाळूज – ६९.५३, सांगोले – ७८.६५, जोंधळखिंडी – ७०. ५५ टक्के.

हेही वाचा…

Back to top button