नीरज चोप्रा याची जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री! | पुढारी

नीरज चोप्रा याची जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री!

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नीरजने भारताला टोकियोब  ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरज देशाचा आवडता बनला आहे. खेळाच्या मैदानात इतिहास रचणाऱ्या नीरजने जाहिरातीच्या विश्वातही आपली दमदार एन्ट्री केली आहे.

नीरजने त्याची एक जाहिरात पोस्ट करत जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. ही जाहिरात विनोदी आहे आणि नीरजचा अभिनय बघून चाहते त्याची अजूनच वाहवा करत आहेत. नीरज एका क्रेडिट कार्ड पेमेंट अॅपच्या जाहिरातीत दिसत आहे. रविवारी आयपीएल -२०२१ चा दुसरा भाग सुरू होण्यापूर्वी ही जाहिरात सोशल मीडियावर आली. नीरजने या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल द्रविडही या क्रेडिट कार्ड कंपनीची जाहिरात करताे. या जाहिरातीमध्ये त्याने बंगळुरूच्या वाहतुकीदरम्यान आपला राग व्यक्त केला होता, तर यामध्ये भारताच्या आणखी तीन क्रिकेटपटूंना बॉय बँडमध्ये दाखवले होते.

या जाहिरातीमध्ये नीरज मीडिया पर्सन, कॉर्पोरेट सीईओ, बँक मॅनेजर, बॉलिवूड निर्माता असे बनून हास्यास्पद संवाद बोलताना आणि विनोदी चित्रपटाची नावे देत प्रश्न विचारताना दिसत आहे.

टोकयो ऑलिम्पिकमधील मेडल जिंकल्यानंतर नीरजवर बक्षिसांचा खुप वर्षाव झाला होता. यानंतर नीरजची जाहिरातीच्या विश्वातही मागणी वाढली. मीडिया रिपोर्टनुसार नीरजच्या जाहिरातीच्या मानधनात वाढ झाली आहे. या बाबतीत विराट कोहलीनंतर नीरज चोप्रा हा एकमेव भारतीय खेळाडू पुढे आहे.

nana patole : केंद्रात ब्लॅकमेलिंग करणारे सरकार; नाना पटोलेंचा घणाघात

नीरज यापूर्वी भारतीय हॉकीपटू पीआर श्रीजेशसह कौन बनेगा करोडपतीमध्येही दिसला होता. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने जाहिरातीमध्ये आपला हटके लुक आणि दमदार अभिनय दाखवला आहे.

Back to top button