FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकात क्रोएशियाने पटकावले तिसरे स्थान; मोरोक्कोचा २-१ ने पराभव

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकात क्रोएशियाने पटकावले तिसरे स्थान; मोरोक्कोचा २-१ ने पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कतारमधील अंतिम टप्प्यावर आलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाने मोरोक्कोवर २-१ अशा गोल फरकाने पराभव केला. सामन्य़ात क्रोएशियाकडून जोस्को गार्डिओल याने आणि मिस्लाव ओरसिक यांनी गोल केला. तर मोरोक्कोसाठी आचराफ दारी याने एक गोल केला. या सामन्यात  विजय मिळवून क्रोएशियाने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. (FIFA WC 2022)

सामन्यात दोन्ही संघानी आक्रमक खेळीचा अवलंब केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला क्रोएशियाच्या गार्डिओलने हेडरने उत्कृष्ट गोल करत संघाला १-० अशी आघाडी ळवून दिली. यानंतर लगेचचं नवव्या मिनिटाला मोरोक्कोच्या अश्रफ दारीने हेडरवर गोल करत संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. (FIFA WC 2022)

जोस्को गार्डिओल हा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियासाठी गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याचे वय सध्या २० वर्षे ३२८ दिवस आहे. इव्हान पेरिसिकच्या सहाय्यावर गार्डिओलने गोल केला. यापूर्वी हा विक्रम इविका ओलिचच्या नावावर होता. त्याने २००२ मध्ये २२ वर्षे २६७ दिवस इतके वय असताना गोल केला होता.

त्याने हा गोल इटलीविरुद्ध गोल केला होता. इव्हान पेरिसिकच्या सहाय्यावर गार्डिओलने गोल केला. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मिस्लाव ओरसिकने ४२ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. लिवाजाच्या असिस्टवर ऑर्किचने हा गोल केला.

क्रोएशियाने मोरोक्कोवर २-१ अशी आघाडी घेतली होती. सातव्या मिनिटाला गार्डिओलने क्रोएशियासाठी पहिला गोल केला. यानंतर नवव्या मिनिटाला मोरोक्कोच्या अश्रफ दारीने गोल करून स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. ४२ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या ऑर्किचने गोल करत आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या शेवटपर्यंत मोरोक्कोच्या खेळाडूंनी क्रोएशियाशी आघाडी कमी करण्यासाठी खेळाडूंनी अनेक चढाया केल्या. परंतु, क्रोएशिच्या खेळाडूंनी केलेल्या उत्तम बचावामुळे मोरोक्कोला आघाडी कमी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात क्रोएशियाने बाजी मारली. २०१८ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील दुसरे स्थान पटकावले होते.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news