अकोला; पुढारी वृत्तसेवा : शहरात काही युवकांनी दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून मादक पदार्थ पाजून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (१७ ) सकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन ते चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी संध्याकाळी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. १६) दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घरी परत जात होत्या. या वेळी त्यांना एक ओळखीचा युवक भेटला. घरी सोडतो असे म्हणून त्याने दोघींनाही गाडीवर बसवून सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील एका अनोळखी ठिकाणी नेले. दरम्यान, त्याने मुलींना कोल्ड्रींक्स पिण्यास दिले. यामध्ये त्याने मादक पदार्थ मिसळले होते. कोल्ड्रींक्स पिल्यानंतर पीडित मुलींना गुंगी यायला लागली. याचदरम्यान आरोपीस व त्याच्या अन्य मित्रांनी अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केले.
अकोल्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने घटनास्थळी भेट दिली. सिव्हील लाईन पोलिसांना याबातच्या चौकशीचे निर्देश दिले. पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष दुधगावकर हे स्वत: शनिवारी सकाळपासून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
हेही वाचा