Virat Kohli And Bhagwant Mann : विराटने अवघ्‍या चार तासांमध्‍येच पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना ठरवले ‘खोटे’!, जाणून घ्‍या, नेमकं काय घडलं?

Virat Kohli And Bhagwant Mann : विराटने अवघ्‍या चार तासांमध्‍येच पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना ठरवले ‘खोटे’!, जाणून घ्‍या, नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने बांगलादेशाविरोधात तिसऱ्या वनडेमध्ये दमदार खेळीचे प्रदर्शन केले. शतक झळकावत त्‍याने नवा विक्रम आपल्‍या नावावर केला. जवळपास तीन वर्षांनतर वनडे क्रिकेटमध्ये त्याने शतकी खेळी केली. त्‍याच्‍या या खेळीने पंजाबचे मुख्‍यमंत्री भगवंत मान यांना खोटे ठरवले. नेमकं काय घडले ते जाणून घेवूया…  (Virat Kohli And Bhagwant Mann )

भगवंत मान यांचे विधान चर्चेत

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवार,८ डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत आम आदमी पार्टीची कामगिरी निराशाजनक झाली. आज ( दि. १० ) सकाळी माध्‍यम प्रतिनिधींनी पंजाबचे मुख्‍यमंत्री भगवंत मान यांना गुजरातमधील अपयशाचे कारण विचारले. त्‍यावेळी मान यांनी विराट कोहलीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, "विराट कोहली हा दररोज शतक झळकावत नाही.यासाठी खूप सराव करावा लागतो. भगवंत मान यांच्या विधानानंतर काही तासांमध्‍ये विराटने बांगलादेश विरुद्‍धच्‍या वन डे सामन्‍यात शतक झळकावले. त्‍यामुळे मान यांचे विधान चर्चेत आले. तसेच विराटने आपल्‍याववरील टीकेला बॅटने उत्तर दिले, अशा प्रतिक्रिया विराटचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत.   (Virat Kohli And Bhagwant Mann )

काही तासांमध्‍येच विराटचे दमदार शतक

भारत आणि बांगलादेश वनडे सामन्‍यात आज विराट कोहली याने सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्‍याने ८५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्‍या मदतीने आपलं शतक पूर्ण केले. विराटचे वनडेमधील ४४ वे तर  कारकीर्दीतील ७२ वे शतक ठरले. या कामगिरीमुळे त्‍याने ऑस्‍ट्रेलियाच्‍या रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटिंग याने आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्‍ये ७१ शतके झळकावली होती. आजच्‍या शतकी खेळीमुळे विराट कोहली हा सर्वाधिक शतकी खेळी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. अग्रस्‍थानी सचिन तेंडुलकर असून, त्‍याने १०० शतके झळकावली आहे.

बांगलादेशमध्‍ये एक हजार धावा करणारा भारतीय फलंदाज

आजच्‍या सामन्‍यात विराटच्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. बांगलादेशमध्‍ये एक हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. बांगलादेश हा विराटने एक हजार धाव केल्‍याचा तिसरा देश ठरला आहे.

वनडे क्रिकेट मधील 'शतकवीर'

सचिन तेंडुलकर – 49 शतक
विराट कोहली – 44 शतके
रिकी पाँटिंग – 30 शतक
रोहित शर्मा – 29 शतक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news