IND Vs BAN : टीम इंडियाला मोठ्या विजयाची गरज | पुढारी

IND Vs BAN : टीम इंडियाला मोठ्या विजयाची गरज

मीरपूर; वृत्तसंस्था : भारत आणि बांगला देश (IND Vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज, बुधवारी होणार आहे. या सामन्यात मोठा विजय मिळवून पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचे दु:ख हलके करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आता ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आहे. त्यामुळे बुधवारी बांगला देशविरुद्धच्या दुसर्‍या वन-डेसाठी तो टीम इंडियाच्या ‘प्लेईंग इलेव्हन’मधील काही फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. रोहित ‘प्लेईंग इलेव्हन’मधून शिखर धवनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो, त्याच्या जागी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. ईशान किशन हा डावखुरा स्फोटक फलंदाज असून, तो सलामीला रोहित शर्मासह टीम इंडियाला चांगली सुरुवात देऊ शकतो. फलंदाजीत शिखर धवनपेक्षा ईशान किशन जास्त धोकादायक आहे. शिखर धवनची बॅट शांत आहे, त्यामुळे त्याला दुसर्‍या वन-डेदरम्यान बेंचवर बसावे लागू शकते. (IND Vs BAN)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगला देशविरुद्धच्या दुसर्‍या वन-डेच्या प्लेईंग इलेव्हनमधून अष्टपैलू शाहबाज अहमदला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाहबाज अहमद फलंदाजीदरम्यान शून्यावर बाद झाला आणि गोलंदाजीदरम्यान त्याने एकही विकेट घेतली नाही. (IND Vs BAN)

संबंधित बातम्या

संघ यातून निवडणार : (IND Vs BAN)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगला देश : नजमूल हुसेन शांतू, तमीम इक्बाल (कर्णधार), यासिर अली, आसिफ हुसेन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामूल हक (यष्टिरक्षक), लिटन दास (यष्टिरक्षक), मुशफिकूर रहीम (यष्टिरक्षक), नुरुल हसन (यष्टिरक्षक), इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजूर रहमान, नसीम अहमद.

शार्दूलला दुखापत; उमरानला संधी (IND v BAN)

जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर दुसर्‍या वन-डेसाठी अनफिट झाला आहे. पहिल्याच सामन्यात गोलंदाजी करताना शार्दूलला त्रास होत होता. त्यामुळे आता तो दुसरी वन-डे खेळले का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेनंतर कसोटी मालिकादेखील होणार आहे. अशात संघ व्यवस्थापन कोणताही धोका घेणार नाही. शार्दूलला विश्रांती देऊन जम्मू-काश्मीरचा जलद गोलंदाज उमरान मलिक याला संधी दिली जाऊ शकते. मलिकने भारताकडून फक्त 3 वन-डे सामने खेळले आहेत. या 3 सामन्यांत त्याने 3 विकेटस् घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने पदार्पण केले होते.

अधिक वाचा :

Back to top button