India Tour of Bangladesh 2022 | टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमधून बाहेर

India Tour of Bangladesh 2022 | टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरीजमधून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश विरुद्ध रविवारपासून (दि. ४डिसेंबर) सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी (ODI series) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला (India Tour of Bangladesh 2022) मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. शमी १४ डिसेंबरपासून चितगाॅंग येथे होणार्‍या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातून टी२० वर्ल्डकप खेळून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शमीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीवर परिणाम होणार आहे. कारण जसप्रीत बुमराह देखील संघातून बाहेर आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, "ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकप नंतर शमीने सराव सुरू केला होता. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे आणि तो १ डिसेंबर रोजी टीम इंडिया सोबत बांगलादेशला गेला नाही. मोहम्मद शमीला झालेली दुखापत किती गंभीर आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. (India Tour of Bangladesh 2022)

जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱ्या आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. पण त्याआधी शमी कसोटी मालिकेतून बाहेर राहिल्यास कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे. शमीने कसोटी क्रिकेटमधील ६० सामन्यांत २१६ विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघातून शमी कसोटीतून बाहेर राहिल्यास भारताकडे नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांची निवड करावी लागणार आहे. पहिल्या चार दिवसांच्या खेळात सैनीने चार विकेट घेतल्या, तर मुकेशने तीन बळी घेतले आहेत. मुकेश अनकॅप्ड खेळाडू आहे. तर सैनीने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण करून भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सप्टेंबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून अद्याप बरा झालेला नाही. तो आधीच एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर आहे. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर चितगाँगमध्ये भारत- बांगलादेश यांच्यात १४ ते १८ डिसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना होईल तर २२ ते २६ डिसेंबरदम्यान ढाक्यामध्ये दुसरी कसोटी होणार आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news